चायना चाकू विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स’ वेबसाईटवर ‘वॉच’ ------

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:06+5:302021-07-29T04:14:06+5:30

प्रदीप भाकरे अमरावती : शहरात अलीकडे खुनाची नकोशी हॅटट्रीक नोंदविली गेली. खुनाच्या तीनही घटनांमध्ये चायना चाकू वापरण्यात आला. ते ...

‘Watch’ on e-commerce website selling China knives ------ | चायना चाकू विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स’ वेबसाईटवर ‘वॉच’ ------

चायना चाकू विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स’ वेबसाईटवर ‘वॉच’ ------

Next

प्रदीप भाकरे

अमरावती : शहरात अलीकडे खुनाची नकोशी हॅटट्रीक नोंदविली गेली. खुनाच्या तीनही घटनांमध्ये चायना चाकू वापरण्यात आला. ते धारदार चाकू ‘ऑनलाईन’ मागविले जातात हे स्पष्ट होताच, पोलीस आयुक्तांनी अशा कंपन्यांवर कटाक्ष रोखला आहे. शहरात चायना चाकूची ऑनलाईन विक्री व वितरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित कंपन्यांच्या नावे सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार तसे आदेश पारित केले आहेत. तो आदेश संबंधित कंपन्या व ई-कॉमर्स’ वेबसाईट, प्लॅटफॉर्मला ई-मेल करण्यात आला आहे.

खून वा खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये चायना चाकूचा सर्रास वापर केला जात आहे. चायना चाकू हा ‘डोमेस्टिक अप्लायंसेेस’ अर्थात घरगुती वापराचे साहित्य या वर्गवारीत मोडतो. त्यामुळे पोलीस तो चाकू जप्त करूनही शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवू शकत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊन कुणाला संपविण्यासाठी चायना चाकूचा वापर बिनदिक्कतपणे केला जात आहे. अगदी काही अल्पवयीन मुलेदेखील दहशत निर्माण करण्यासाठी चायना चाकू बाळगत असल्याचे धक्कादायक निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. मोतीनगर, धाबा व महादेवखोरी येथे दिवसाआड झालेल्या हत्यांमध्ये चायना चाकूनेच सपासप वार करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या कमालीच्या गंभीर झाल्या आहेत. १७ ते २५ या वयोगटातील विशिष्ट तरुण चक्क चाकूचा डीपी ठेवून स्वत:चा शिक्का जमविण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळल्याचे धक्कादायक वास्तव अलीकडच्या घटनांमुळे उघड झाले आहे.

३०० ते ५०० रुपयांमध्ये तीन दिवसात ‘डिलिव्हरी’

वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या काही कंपन्यांचे ॲप डाऊनलोड करून, त्यावर वस्तूंची ऑनलाईन खरेदी करता येते. तीन ते चार दिवसांमध्ये दिलेल्या पत्त्यावर संबंधित कंपनीचे डिलिव्हरी बॉय’ त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवून देतात. २९९, ३८९, ५४४, ६४९, ४९९, ११०० रुपयांपर्यंत हे चायना चाकू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

काय आहे आदेशात?

तीक्ष्ण धार असलेले प्राणघातक शस्त्र ज्याच्या पात्याची लांबी ९ इंचापेक्षा जास्त किंवा ज्याच्या पात्याची रूंदी २ इंचापेक्षा जास्त आहे, अशा शस्त्रांची अमरावती शहरात इ कॉमर्स प्लॅटझॉर्म/ऑनलाईन साईटवरून विक्री करण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. अशाप्रकारचे शस्त वगळून असे शस्त्र ज्याच्या पात्याची लांबी ९ इंचांपेक्षा कमी किंवा पात्याची रूंदी २ इंचापेक्षा कमी असलेले शस्त्र ऑनलाईन विक्री करत आहेत, त्यांनी अमरावती शहरातील ऑनलाईन शस्त्रे खरेदी करणार्या ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, त्या व्यक्तीचा इमेल आयडी, खरेदी केलेल्या शस्त्राचा प्रकार, शस्त्राचे फोटो, डिलिवरी पत्ता याबाबतची संपुर्ण माहिती पोलीस आयुक्तांच्या ईमेल आयडीवर संबंधित कंपन्यांनी पाठवावी.

कोट

चायना चाकू विक्री व वितरणाला ब्रेक लावण्यासाठी सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार निर्बंध आदेश काढले. ते आदेश संबंधित कंपन्यांना ई-मेलने पाठविले.

- डॉ.आरती सिंह,

पोलीस आयुक्त

Web Title: ‘Watch’ on e-commerce website selling China knives ------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.