शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

शहरातील चौकाचौकांत २० पथकांचा ‘वॉच‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

अमरावती : कठोर संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकाला अनिवार्य आहे. मात्र, काही नागरिकांकडून शिस्तीचे ...

अमरावती : कठोर संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकाला अनिवार्य आहे. मात्र, काही नागरिकांकडून शिस्तीचे पालन होत नसल्याने प्रशासनाने आता कारवाईचा पावित्रा घेतला आहे. गुरुवारपासून तीन दिवस शहरातील चौकाचौकांत २० पथकांचा ‘वॉच‘ राहणार आहे. चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही पथके दंडात्मक कारवाया करतील, तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी जारी केले आहेत.

या पथकात शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी आहेत. प्रत्येक पथकात चार कर्मचारी आहेत. यात महापालिका व पोलीस विभागाचा प्रत्येकी एक कर्मचारी प्रत्येक पथकात राहणार आहे. या पथकांना शहरातील परिसर विभागून देण्यात आलेला आहे. नागरिक, आस्थापना तसेच प्रतिष्ठानाद्वारा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्यास या पथकांद्वारे दंडनीय कारवाई केली जाणार आहे.

पहिले पथक उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजित भोसले यांचे आहे. यामध्ये राज्य कर निरीक्षक सागर राजूरकर यांचे पथकाला कोर्ट परिसर, सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता अनिल मोहाळे यांना गाडगे बाबा मंदीर परिसर, सहा कामगार आयुक्त, अनिल कुटे यांना भाजीबाजार परिसर, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांना मोची गल्ली, समाजकल्याणच्या सहायक आयुक्त मंगला मून यांच्याकडे कॉटन मार्केट परिसर राहणार आहे.

उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्या नेतृत्वातील पथकात कौशल्य विकासचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळखे यांना दस्तूरनगर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गुडधे यांच्याकडे रुख्मिनीनगर, जलसंधारण अधिकारी निपाणे यांच्याकडे इतवारा बाजार, उद्योग निरीक्षक सांगळे यांना जवाहर गेट ते सराफा, जीएसडीएचे संजय कराड यांच्याकडे गुलशन मार्केट हा परिसर राहणार आहे.

बॉक्स

जवाहर रोड, गांधीचौक, मालटेकडी व नवाथे

उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या नेतृत्वातील पथकात नगररचनाचे सहा. संचालक वाघाडे यांच्याकडे जवाहर रोड, नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांना रविनगर, उद्योग निरीक्षक एन.एन. इंगळे यांना रविनगर, सहायक नगर रचनाकार श्रीकांत पेठकर यांना मालटेकडी परिसर, उपविभागीय अभियंता द. श. दारोडे यांच्या पथकाचा नवाथे चौक परिसरात वॉच राहणार आहे.

बॉक्स

जयस्तंभ, राजकमल, इर्विन, पंचवटी

एसडीओ उदयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वातील पथकात उपकार्यकारी अभियंता एन.एस सावरकर यांना जयस्तंभ चौक, राज्य कर निरीक्षक सागर मोटघरे यांना राजकमल चौक, विक्रीकर निरिक्षक शैलेश पिल्ले यांना इर्विन चौक, विक्रीकर निरीक्षक राजेश राऊत यांना मालटेकडी परिसर व विक्रीकर निरीक्षक मंगेश भोनखाडे यांच्या पथकाचा पंचवटी चौक परिसरात वॉच राहील.

बॉक्स

मास्क नसल्यास ७५० रुपये दंड

आता चेहऱ्यावर मास्क नसल्यास ७५० रुपये दंडाची आकारणी होणार आहे. आस्थापना, प्रतिष्ठाने, दुकाने यामध्ये दोन ग्राहकांत किमान तीन फुटांचे अंतर नसल्यास दुकानदार किंवा चालकास ३५ हजारांचा दंड आकारला जाईल. याशिवाय दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास एफआयआर नोंदविला जाणार आहे.