रोगराई वाढली : डासांचा प्रादुर्भाव, महापालिकेचे दुर्लक्षबडनेरा : बडनेरा शहरात ठिकठिकाणी घाण साचली आहे. कचऱ्यांचे ढिगारे आरोग्यासाठी घातक ठरत अहेत. साथीच्या आजाराने रुग्ण त्रस्त आहेत. मात्र महानगरपालिका प्रशासन व नगरसेवक या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. डासांचा मोठा प्रादुर्भाव असल्याने रोगराई वाढली आहे. दवाखाने रुग्णांनी गजबजले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. जी काही साफसफाई होत आहे तो कचरा शहरातच टाकला जात आहे. बऱ्याच दिवसांपर्यंत कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे घाणीची दुर्गंधी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. बारीपुऱ्यात कचऱ्याचा ढिगारा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांवर डुकरांचा संचार राहतो आहे तो कचरा रस्त्यावर सुद्धा येत आहे. पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या मनपाच्या शाळेला लागूनच शेणाचे ढिगारे संगळून आहेत. हॉटेलचालक ओला कचरा वाट्टेल तिथे टाकतात. त्या कचऱ्याची दुर्गंधी परिसरवासीयांसाठी तापदायक ठरत आहे. बसस्थानकाला लागूनच प्रभागातील केरकचरा टाकला जातो. राजेश्वर युनियन हायस्कूलपासून जाणाऱ्या रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे आहेत. बडनेऱ्यातील घाणीकडे मनपा व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच डासांचा प्रादुर्भाव होतो आहे. सध्या बडनेरा शहरात साथ रोगाने रुग्ण त्रस्त आहेत. दवाखाने गर्दीने फुलले आहेत. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष पुरवावे, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. खुद्द महापालिका कार्यालयच घाणीच्या विळख्यात आहे. (शहर प्रतिनिधी)हॉटेलचालक व चिकन सेंटर्सधारकांचा मनमानी कारभार बडनेरा शहरातील बहुतांश हॉटेल चालक व चिकन सेंटर्सधारक त्यांच्याकडी केरकचरा वाट्टेल तिथे टाकत आहे. त्याची दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मनपा प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्व का दुर्लक्ष करीत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये आहे. बऱ्याच दिवसांपासनू घंटीकटले, आॅटो देखील प्रभागात नियमित फिरत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये आहे.
बडनेरा शहरात अस्वच्छतेचा कहर
By admin | Updated: September 13, 2016 00:22 IST