तिवसा : तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा धस्कट येथे सरपंचांनी स्वखर्चातून टँकर बोलावून गावकऱ्यांची तहान भागविणे सुरू केले आहे.तिवसा, कुºहा, गुरुदेवनगर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे. तिन्ही गावांत दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शेंदोळा धस्कट, शेंदोळा खुर्द, शिरजगाव मोझरी व जावरा या गावांतदेखील आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यात शेंदोळा धस्कट येथे महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपासून कमी पर्जन्यमान झाल्याने ही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात भीषण पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला असताना, एकाही गावात प्रशासनाच्यावतीने टँकर पाठविण्यात आलेला नाही.ड्रमभर पाण्यासाठी ४० ते ६० रुपयेतिवसा शहरातील पाणीपुरवठा दहा ते पंधरा दिवसाआड होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. २० लिटर पाण्यासाठी त्यांना किमान ४० ते ६० रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे, आंघोळीला पाणी नसल्याने एरवी रोज होणारी आंघोळ दिवसाआड गेली आहे.
वर्धा नदी कोरडी तिवसा तहानले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:24 IST