शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वाघ याच्या अर्जावर बुधवारी खामगाव न्यायालयात सुनावणी, एसीबीच्या अधिका-यांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:33 IST

अमरावती : बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रकरणातील एसीबीला हवा असलेल्या चंद्रपूरच्या कार्यकारी अभियंत्याने खामगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. संजय वाघ याला जामीन मिळतो की न्यायालय अर्ज फेटाळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यावरच पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. संजय वाघ अद्यापही फरार ...

अमरावती : बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रकरणातील एसीबीला हवा असलेल्या चंद्रपूरच्या कार्यकारी अभियंत्याने खामगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. संजय वाघ याला जामीन मिळतो की न्यायालय अर्ज फेटाळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यावरच पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. संजय वाघ अद्यापही फरार असून, एसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) अंतर्गत नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. यवतमाळच्या बाजोरfया कन्स्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्राद्वारे हे काम मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्र जीवन प्रधिकरणचे चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता संजय वाघ याचा महत्त्वाचा रोल असल्याचे एसीबीच्या अधिकाºयांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. खामगाव शहर ठाण्यात ४ नोव्हेंबरला मजीप्राचा चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता संजय वाघसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वाघ याने अर्ज केला होता. त्यावर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होत आहे. एसीबीने चार दिवसांपूर्वीच वाघचे चंद्रपुरातील निवास्थान सील केले होते. मजीप्राला सोमवारी एसीबीने जिगाव प्रकरणात वाघ हा आरोपी असल्याचे अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.