शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

वडाळी येथील दारु दुकानाचा प्रश्न पेटणार!

By admin | Updated: December 13, 2014 22:30 IST

महापालिका प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या वडाळी येथे बंद असलेल्या देशी दारुविक्री दुकानाबाबत २८ डिसेंबर रोजी नव्याने मतदान घेतले जाणार आहे. बाटली आडवी की उभी?

अमरावती : महापालिका प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या वडाळी येथे बंद असलेल्या देशी दारुविक्री दुकानाबाबत २८ डिसेंबर रोजी नव्याने मतदान घेतले जाणार आहे. बाटली आडवी की उभी? हे महिलाशक्तीच्या हाती असून प्रशासन त्यानंतर या दुकानाबाबत निर्णय घेईल. मात्र हे दारुचे दुकान सुरु होऊच नये, असा आक्रमक पवित्रा काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्या महिलांनी घेतला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा मतदान होणार आहे.वडाळी येथे प्रभू झांबानी यांचे परवाना असलेले देशी दारुचे दुकान आहे. मात्र या दुकानामुळे वडाळीत कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०१४ रोजी मतदान घेण्यात आले. मात्र मतदार यादीत घोळ असल्यामुळे अनेक महिला मतदारांची नावे यादीत नव्हती. परिणामी ही मतदान प्रक्रिया दारु विक्रेत्याच्या इशाऱ्यावर ‘मॅनेज’ करण्यात आली, असा आरोप वडाळीत देशी दारु विक्री विरोधात असलेल्या आंदोलकांनी केला होता. ही मतदान प्रक्रिया नकोच, दुकानही सुरु होता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत त्यावेळी वडाळीत महिलाशक्ती एकवटली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पुढील आदेशापर्यत देशी दारु विक्रीचे दुकान सुरु करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र १० महिन्याचा कालावधी लोटला असताना दुकानासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असा अर्ज देशी दारु विक्रीचे परवानाधारक झांबानी यांनी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाकडे केला होता. शासनाच्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातही पोहचली आहे. प्रशासन निवडणूक प्रक्रिया राबविण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परवाना धारक झांबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महापालिका प्रशासनाला दारु विक्री दुकानासंदर्भात मतदान घेण्याचे कळविले असल्याची माहिती न्यायालयात सादर केली. त्यामुळे महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना केल्यात. त्यानुसार आयुक्तांनी न्यायालयात हजर राहून मतदान प्रक्रिया राबविण्याबाबतचे प्रतीज्ञापत्र लिहून दिले आहे. दारुची बाटली आडवी की उभी. याबाबत येत्या २८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी मतदान राबविण्याबाबत रितसर कार्यक्रम घोषीत केला जाणार आहे. चार हजार महिला मतदार असलेल्या यादीनुसार पुढील मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. वडाळीत बाटली आडवी की उभी? हा निर्णय महिलांच्या हाती राहणार आहे. देशी दारु विक्रेता परवानाधारक शासन, प्रशासन स्तरावर सर्वच घटनाक्रम आपल्या बाजुने कसे होईल, याचे सुक्ष्म नियोजन करीत असल्याचे चित्र आहे.परंतु ज्या हक्कासाठी महिला एकवटल्या आहेत, त्यांच्या पाठीशी पुरुषवर्ग उभा राहतो काय? हे २८ डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)