शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

मतदार यादी होणार ॲक्युरेट! शंभरी पार केलेल्या १६६७ मतदारांची विशेष तपासणी

By जितेंद्र दखने | Updated: May 4, 2023 21:55 IST

ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी निवडणूक विभागाव्दारे मोहीम.

अमरावती: लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणूकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू केली आहे. मतदार यादी अचूक करण्याचा प्रयन्नाचा भाग म्हणून सन २०२३ च्या मतदार यादीत ना असलेल्या ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची पडताळणी केली जात आहे.

८ विधानसभा मतदार संघात ४ मे २०२३ च्या माहितीनुसार जिल्हाभरात २३ लाख ८७ हजार ३१५ एवढे मतदार आहेत.यामध्ये शतायुषी असलेल्या मतदारांची संख्या आजघडीला १ हजार ६६७ एवढी आहे.जिल्ह्यात ८ विधानसभा क्षेत्रात २३ लाख ८७ हजार ३१५ मतदार आहेत.यामध्ये वयाची शंभरी ओलाडणाऱ्या मतदारांची संख्या १ हजार ६६७ आहे.या सर्व मतदारांची विशेष तपासणी मोहीम जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने तालुका निवडणूक विभाग आणि विधानसभा निहाय मतदार याद्या तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

वर्षभरानंतर राज्यात लोकसभा,विधानसभा निवडणूक होणार आहे.या पार्श्वभूृमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत.जिल्ह्यात ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ६६ हजार १२४ मतदारांचे निवडणूक कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.जिल्ह्यात असणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये २३ लाख ८७ हजार ३१५ मतदार आहेत.यामध्ये १२ लाख ३१ हजार १७७ पुरूष,११ लाख ५६ हजार ०५६ महिला आणि ८२ तृृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.जिल्ह्यात ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची संख्या ६६ हजार १२४ इतकी असली तरी ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांची संख्या बरीच मोठी आहे.

वयानुसार मतदार संख्या८०-८९-६६१२४९०-९९-१५२२११०० प्लस-१६६७

विधानसभा निहाय शंभरी पार मतदारधामनगाव रेल्वे-१३९बडनेरा-४२३अमरावती-३४५तिवसा-२५१दर्यापूर-१५४मेळघाट-१०६अचलपूर-६९मोर्शी-१८०जिल्हा निवडणूक विभागामार्फत बिएलओच्या माध्यमातून ८० वर्षावरील मतदारांची विशेष तपासणी मोहीम सध्या चालू आहे.त्यामध्ये ८० वर्षावरील स्थलातंरीत,किंवा मयत मतदारांची नाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या महिन्याअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. श्याम देशमुख, नायब तहसीलदारनिवडणूक विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती