लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगावपेठ येथील महामार्गनजीक शासकीय वसाहतीनजीक जीवन प्राधिकरणच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लीक झाल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकदिवसाआड नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे करण्यात येत आहे. राजकीय पुढारी पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नियोजन करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, जीवन प्राधिकरणच्या पाइप लाइनमध्ये अनेक ठिकाणी लीकेज होत आहेत. नागरिकांनी माहिती दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या गळतीचा व्हिडीओ तयार करून तो सामाजिक कार्यकर्त्यांनी मजीप्राचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ व कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांना पाठविला. त्यावरून कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी उशिरा रात्री घटनास्थळाला भेट दिली. अज्ञात व्यक्तीने व्हॉल्व्ह लीक करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास आले. व्हॉल्व्हचे लीकेज माणसे पाठवून मंगळवारी दुरुस्त केले जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विधी महाविद्यालयाच्या मैदानात साचले तळेअधिकाऱ्यांना सापडेना लिकेजअमरावती : गेल्या आठ दिवसांपासून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाजवळ महराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीवर एक लीकेज आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सदर लीकेजमधून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे व ते पाणी विधी महाविद्यालयाच्या मैदानात साचत आहे. मात्र, याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी अधिकाºयांनी भेट दिल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश चारथळ यांनी दिली. मात्र, अधिकाºयांना गेल्या तीन दिवसांपासून नेमका लीकेज कुठे आहे व पाण्याचा अपव्यय कुठून होत आहे, ही बाब कळलेली नाही. त्यामुळे याबाबत विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
व्हॉल्व्ह लीक : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:42 IST
नांदगावपेठ येथील महामार्गनजीक शासकीय वसाहतीनजीक जीवन प्राधिकरणच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लीक झाल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
व्हॉल्व्ह लीक : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
ठळक मुद्देनांदगावपेठ येथील घटनामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष