शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा जोडण्यासाठी ‘वीरुगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

आधीच चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना सन २०१९ पासून कोरोनाने सर्व काही संपविले. अशा बिकट परिस्थितीत जीवन कसे जगायचे, ही काळजी असताना महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती करीत जबरीने वसुली  करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : महावितरणकडून होत असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबविण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ‘शोले’ आंदोलन केले. मोबाईल टॉवरवर उंचावर त्यांनी ठाण मांडले. पोलिसांनी मागण्या मान्य होण्यापूर्वी खाली उतरविण्याचा प्रयत्न केल्यास उडी घेऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. सायंकाळी एक महिन्याच्या मुदतीच्या आश्वासनावर ते खाली उतरले. आधीच चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना सन २०१९ पासून कोरोनाने सर्व काही संपविले. अशा बिकट परिस्थितीत जीवन कसे जगायचे, ही काळजी असताना महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती करीत जबरीने वसुली  करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या मोहिमेला स्थगिती मिळावी, ही वसुली मेनंतर सुरू करावी, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २ फेब्रवारी रोजी सकाळपासून अंजनगाव सुर्जी येथील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. युवा स्वाभिमानचे मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, अजय देशमुख हे टॉवरवर चढून बसले. ज्यांनी बिलाचा भरणा अद्याप केलेला नाही, अशा  सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा त्वरित चालू करून करावी, वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू. त्यापूर्वी पोलीस प्रशासनाने आम्हाला उतरविण्यासाठी पाऊल उचलले, तर आम्ही टॉवरवरून उडी घेऊ, अशा प्रतिक्रिया टॉवरवर चढलेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली. आंदोलनस्थळी सकाळपासूनच युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सहायक उपनिरीक्षक विशाल पोळकर व इनामदार यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सहायक अभियंता संदीर गुजर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आधी आठ दिवसांची मुदत नाकारल्यानंतर त्यांनी वीज बिल भरण्यास एक महिन्याची मुदत दिली. त्यावर समाधान मानत आंदोलक सायंकाळी ६ च्या सुमारास टॉवरवरून उतरले. 

एक महिन्यापर्यंत कुठलेही कनेक्शन बंद करण्यात येणार नाही. त्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना पाच हजार रुपये तातडीने भरावे लागतील. - संदीप गुजर सहायक अभियंता

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कापत आहे. त्यामुळे युवा स्वाभिमानला शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन करावे लागले. मोहीम न थांबल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. - रवि राणा, आमदार, बडनेरा

 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी