शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल फिव्हर, रुग्णालये हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:37 IST

गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकाळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला : शासकीय, खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची धाव

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ न कळत खाण्यात आल्याने सद्यस्थितीत विविध आजाराची लागण होत असल्याने शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच पाणी पिताना काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. या दिवसांत व्हायरल डिसीजच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होत आहे.मागील पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण असून, सूर्यदर्शन दुर्लभ झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच ठिकठिकाणी नाल्या तुंबल्याने विविध आजारांची लागण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ते २१ जुलै दरम्यान १५४ रुग्ण डायरियाचे, तीन न्युमोनियाचे, दोन कावीळ, ११८ रूग्णांनी टायफाईडचे उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सदर रूग्णांनी जिल्हा सामान्य रूग्णालायत यातील काही रूग्णांवर अद्यापही उपचार सुरूच असून, नव्याने दाखल झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत व्हायरल डिसीजचे रूग्ण तपासणीकरिता येत असल्याची महिती खासगी डॉक्टरांनी दिली. दूषित पाण्यामुळे अतिसाराच्या रूग्णांतही वाढत होत आहे. या दिवसांत पाईपलाईनच्या लिकेजसमुळे नागरिकांच्या घरापर्यंत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यातून अनेक जलजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे सर्वाधिक चांगले, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.अशी घ्या काळजीसर्दी, खोकला व ताप ज्यांना असेल त्यांनी शिंकताना रूमाल वापरावा, ताप असेल तर घरी आराम करावा, डायरियापासून वाचण्यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, बाहेरील पाणी पिऊ नये, पाणी उखळून थंड करून प्यावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होत असून घरातील पाणी या दिवसांत निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.सर्दी, ताप व खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आजारी असल्यास ताप अंगावरून न काढता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्सक अमरावती

टॅग्स :Healthआरोग्य