शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

फिनलेच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

फिनले मिलच्या मेंटेनन्सची कामे सुरू आहेत. २० ते २५ कर्मचारी याकरिता मिलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश भोपाळ येथून एक अधिकारी शहरात दाखल झालेत. त्यांचे वास्तव्य देवमाळीत आहे. शहरात दाखल होताच ते फिनले मिलमध्ये पोहचलेत. परिसरात त्यांनी मुक्त सांर केला. प्रवेश गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह आत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात ते आलेत.

ठळक मुद्देअकोला, भोपाळ येथून अधिकारी दाखल : क्वारंटाईनकडे दुर्लक्ष, सुरक्षा धोक्यात

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक फिनले मिलमध्ये अकोला, भोपाळहून दाखल झालेल्या अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचा भंग केला जात आहे. यात त्यांनी क्वारंटाईनकडे दुर्लक्ष केल्याने तेथी कर्मचाºयांची सुरक्षा धोक्यात आली आहे.फिनले मिलच्या मेंटेनन्सची कामे सुरू आहेत. २० ते २५ कर्मचारी याकरिता मिलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश भोपाळ येथून एक अधिकारी शहरात दाखल झालेत. त्यांचे वास्तव्य देवमाळीत आहे. शहरात दाखल होताच ते फिनले मिलमध्ये पोहचलेत. परिसरात त्यांनी मुक्त सांर केला. प्रवेश गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह आत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात ते आलेत. याची माहिती देवमाळीच्या कोरोना समितीला मिळाली तेव्हा त्या अधिकाºयाला १४ दिवसांकरिता होमक्वारंटाईन केल्या गेले. यात एक दिवस थांबून संबंधित होमक्वारंटाईन अधिकारी कोरोना समितीला चकमा देऊव भोपाळला निघून गेलेत.दुसरे अधिकारी अकोल्याहून बुधवारी फिनले मिलमध्ये पोहचलेत. ना आरोग्य तपासणी, ना स्थानिक प्रशासनाला माहिती. यात या अकोला रिटर्न अधिकाऱ्याचाही फिनले मिलमध्ये मुक्त संचार, सुरक्षा रक्षकांसह कर्मचाऱ्यांशी संपर्क आणि संवाद साधत आहेत. अकोला जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातील परतवाडा - अचलपूरमध्ये दाखल होऊन त्या अधिकाऱ्याने क्वारंटाईन होण्यास नकार दिला. या अधिकाºयाचेही वास्तव्य देवमाळीत असल्याने गाव समितीने त्यांना क्वारंटाईचा सल्ला दिला. पण, याकडे दुर्लक्ष करून आम्हाला मिल सुरू करायची आहे. अकोल्याहून मी अपडाऊन करणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. या दोन अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने व स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरवासी भयभीत झाले आहेत. येत्या काही दिवसांत काही अधिकारी मुंबईहून फिनले मिलमध्ये पोहचणार आहेत. बाहेरगावाहून दाखल होणारे व दाखल झालेल्या अधिकाऱ्याच्या मुक्त संचारामुळे सर्व दहशतीखाली आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या