विनोद शिवकुमारचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 05:00 AM2021-04-19T05:00:00+5:302021-04-19T05:00:56+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार, शिवकुमार याला ३० मार्च रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याला किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन राहावे लागते. त्यानुसार विनोद शिवकुमार याला येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन केले आहे. 

Vinod Shivkumar is still lodged in a temporary jail | विनोद शिवकुमारचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम

विनोद शिवकुमारचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम

Next
ठळक मुद्देचाचणी निगेटिव्ह तरी सूट कशाला? सेंट्रल जेलमध्ये रवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम आहे. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, शिवकुमार याला मध्यवर्ती कारागृहात का पाठविले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, शिवकुमार याला ३० मार्च रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याला किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन राहावे लागते. त्यानुसार विनोद शिवकुमार याला येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन केले आहे. 
तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविणे अनिवार्य असताना व विनोद शिवकुमार याला तात्पुरत्या कारागृहात १८ दिवस झाले असतानाही जुन्या कारागृहात म्हणजे मध्यवर्ती कारागृहात रवानगी केलेली नाही. यादरम्यान दुसरी कोविड चाचणी झाली आणि तीसुद्धा निगेटिव्ह आली. तरीही शिवकुमार याला सूट कशासाठी दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यवर्ती कारागृहात शिवकुमार याच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर नाही. 
कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट, नक्षलवादी, प्रसिद्ध खुनातील आरोपी जेरबंद आहेत, हे विशेष.
 
कारागृहात येणाऱ्या प्रत्येक आरोपीला समान वागणूक दिली जाते, मग तो कुणीही असो. विनोद शिवकुमार यालादेखील तशीच वागणूक दिली जात आहे. तात्पुरत्या कारागृहातील त्याचा कार्यकाळ संपला असला तरी पोलीस बंदोबस्त, सुट्यांमुळे जुने कारागृहात आणता आले नाही. सध्या शिवकुमार क्वारंटाईन आहे.
- रमेश कांबळे 
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह

Web Title: Vinod Shivkumar is still lodged in a temporary jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.