धामणगाव रेल्वे : केवळ दोन रूपयात एक कप सोयाबीनचे पोस्टीक दूध, अस्सल गावरानी चिवडा, मिरची, हळद पावडर, मांडे, केरसुनी तसेच लघु उद्योगाच्या माध्यमातून घरी तयार केलेले विवीध स्टॉल असलेतरी सोयाबीन चे दुध, बासुंदी, खवा याला सर्वाधीक पसंती दाखवीली आहे़ तालुक्यातील महिला बचत गटाने यंदाही भरारी घेतली आहे़ राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील स्वयंम सहाय्यता समुहांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे जिल्हास्तरीय प्रदर्शन अमरावती येथे मागील आयोजीत करण्यात आले आहे़ तालुक्यातील या प्रदर्शनीत धामणगाव प़स़चे विस्तार अधिकारी मिलिंद ठुणूकले व ए़वाय़बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई महिला बचत गट द्वारे खानावळ लावण्यात आली आहे़ तर मिरची व हळद पावडर विविध प्रकारचे फळे, कच्चा चिवडा, विवीध प्रकारचे पापड, मेणबत्ती व अगरबत्ती, निळ, खवा, झुनका भाकर, पापड, शेवया, कुरूड्या सोयाबीन दुध असे विवीध बचत गटाद्वारे उत्पादीत वस्तुचे स्टॉल लावण्यात आले आहे़यात अन्नाभाऊ साठे महिला बचत गट नारगावंडी, तसेच येथीलच संघर्ष महिला बचत गट, तळेगाव दशसार येथील गणेशाय महिला बचत गट, रमाबाई महिला बचत गट विटाळा येथील भरारी महिला बचत गट मंगरूळ दस्तगीर येथील बचत गट, वकानाथ येथील अहिल्याबाई महिला बचत गट सहभागी झाले आहे़ मागील तीन दिवसात धामणगाव तालुक्यातील या महिला बचतगटांच्या स्टॉलला तब्बल सात हजार नागरीकांनी भेट दिली आहे.
विकास गंगोत्रीत सोयाबीन दूध, बासुंदी, मांड्याला पसंती
By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST