शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 Live: मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय?
4
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
5
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
6
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
7
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
8
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
9
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
10
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
11
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
12
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
13
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
14
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
15
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
16
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
17
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
18
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
19
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: July 28, 2016 00:26 IST

उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले.

दोन प्रकल्प फुल्ल : निम्न वर्धाची संपूर्ण दारे उघडली वर्धा : उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. आष्टी, आर्वी व कारंजा तालुक्यात गत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचे आगमन होत असल्याने दोन प्रकल्प फुल्ल झाले आहेत. निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत असून अप्पर वर्धा धरणाची दारेही बुधवारी रात्री उघडण्यात आली. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेला अप्पर वर्धा प्रकल्पाने पातळी गाठली आहे. शिवाय आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प फुल्ल झाला आहे. परिणामी, या प्रकल्पाची संपूर्ण ३१ दारे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. या प्रकल्पातून ५७३ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्पानेही पातळी गाठली असून सांडव्यावरून ११२.६७ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची क्षमता ३४२.५० मीटर असून ३४०.९२ मिटर जलसाठा झाला आहे. पातळी गाठायला केवळ २ मीटर शिल्लक असल्याने बुधवारी रात्री प्रकल्पाची दारे उघडली जातील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील लहान-मोठ्या १५ प्रकल्पांनीही पातळी गाठली आहे. सर्व प्रकल्पांची पातळी गाठायला एक-दोन मिटरच शिल्लक आहे. २४ तासांत जिल्ह्यात आणखी पाऊस झाल्यास सर्वच जलाशये ओसंडून वाहू लागतील. यामुळे नदी, नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या सर्व गेटमधून पाणी सोडण्यात येत असून रात्री अप्पर वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडले जाणार असल्याने आर्वी, देवळी तालुक्यातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)