शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विदर्भाच्या नंदनवनात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:06 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देतलाव कोरडे : चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे.सिडकोच्या स्थापनेनंतर चिखलदऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा कांगावा केला जातो. मात्र, पेयजलाची समस्या चिखलदरावावीयांच्या पाचवीला पुजली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे आखण्यात आले. मात्र, ते कागदावरच राहिले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या बागलिंगा प्रकल्पानेही वणवण थांबलेली नाही. स्थानिकांमध्ये नागरिकांमध्ये दिवसा आड होणाºया पाणीपुरवठयाबाबत संताप व्यक्त होत आहे. पाण्याअभावी पर्यटकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतला चिखलदऱ्याचा बेत रद्द केला आहे.घोषणांचाच पाऊसविदर्भाच्या नंदनवनावर कोसळणाऱ्या पावसावर परतवाडा, अचलपूरनजीकची चंद्रभागा, सापन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव अवलंबून आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. चिखलदºयात दरवर्षी घोषणांचा पाऊस होतो. त्या खरोखरीच घोषणा ठरतात.आठशे ग्राहक अन् तलाव कोरडेचिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदऱ्यात केवळ ८६९ ग्राहक असून, त्यांच्यासाठी दररोज सहा लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील शक्कर तलाव व कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध असून, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी १९९३ मध्ये पूर्णत्वास नेलेल्या शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील पाणीपुरवठा योजनेतूनच चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे.