शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढला, हल्ल्याच्या निरंतर घटना    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 17:24 IST

जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॅरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून, मनुष्यांवर होणा-या वन्यपशुंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अमरावती -  जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॅरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणाºया वन्यपशुंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.वाघाने माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या ९० टक्के घटना जंगलात, तर १० टक्के जंगल आणि गावांच्या सीमेवर झाल्या आहेत. वाघांच्या अधिवासात मानवी समूहाकडून होणा-या अतिक्रमणामुळे त्यांचे अधिवास असुरक्षित झाले आहेत. यंदा पाऊस कमी पडला. जंगलातील नदी-नाल्यांना अपुरे पाणी असल्याने वन्यपशू पाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये धाव घेत असल्याचे चित्र आहे. जंगलालगतची गावे जंगलावर अवलंबून असल्यामुळे वाघ जंगलाबाहेर पडतात आणि जंगलालगतच्या गावांत प्रवेश करतात. त्याठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवतो. अधिकांश घटनांमध्ये वयात येणा-या वाघानेच हल्ले केले आहेत. हल्ल्यानंतर हा वाघ मृतदेह खातसुद्धा नाही. हे प्रमाण फार कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जंगलाशेजारच्या रहिवाशांसाठी वनविभागाकडून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, या योजनांचा लाभ आदिवासींसह अन्य समूहांना मिळत नसल्याची ओरड आहे. नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात सोमवार २ आॅक्टोबर २०१७ रोजी वरूड तालुक्यातील शहापूर शेतशिवारात गंगोत्री हिरालाल नवडे (६५) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या आदिवासीबहुल पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव या तिन्ही गावांत नरभक्षक वाघिणीच्या भीतीने दस-याला सोने देण्याची ४० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. ब्रह्मपुरी (चंद्रपूर) तालुक्यातील गोगाव येथे रविवार १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेतावरून परतणाºया नामदेव नन्नावरे नामक शेतक-यावर वाघाने हल्ला चढविला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्षात वाढ झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. ही बाब वनविभागासाठी अतिशय चिंतनीय असून बºयाच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यूसन २०१६ मध्ये १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात ४७ वाघ, ३२ वाघीण आणि २३ प्रकरणांत वाघ होता की वाघीण, हे कळलेच नाही. यातील ३५ मृत्यू अनैसर्गिक, ४३ नैसर्गिक आणि २४ प्रकरणांत मृत्युची  कारणेच कळली नाहीत. सन २०१५च्या तुलनेत सन २०१६ मध्ये वाघांच्या मृत्युची टक्केवारी देशात १४५ च्या वर वाढल्याचे ‘क्लॉ’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

वाघांच्या मृत्युची टक्केवारीजानेवारी ते मार्च २०१६- २८.४३ टक्केएप्रिल ते जून २०१६- २९.४१ टक्केजून ते सप्टेंबर २०१६- २१ टक्केआॅक्टोबर ते डिसेंबर २०१६- २१.५६ टक्के

वाघांचे वय आणि मृत्यूची टक्केवारीएक ते तीन वर्षे- २७.४५ टक्केचार ते नऊ वर्षे- ३०.३९ टक्केदहा वर्षांवरील- १९.६ टक्केवयांची माहिती नाही- २२.५४ टक्के