शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मान्सूनला उशीर; दशकाचा रेकॉर्ड तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:49 IST

विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये १९ जून रोजी विदर्भात दाखलचक्रीय वात स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.विदर्भात साधारणत: ८ ते ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची परंपरा आहे. रोहिणी नक्षत्रात शेती मशागतीची कामे आटपून ७ जूनला आरंभ होणाऱ्या मृग नक्षत्रात कपाशी पिकाची लागवण करण्यास शेती सज्ज ठेवली जाते. मात्र, पर्यावरणीय बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने पीक उत्पादनासह चारापाण्यावरही विपरीत परिणाम जाणवत आहे. सन २००४ पासून २०१४ पर्यंतचा आढावा घेतला असता, १९ जून २०१४ रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तेव्हा अल्प कालावधीची पिके मूंग, उडीद, ज्वारी, बाजरा यांची पेरणी शेतकऱ्यांना टाळावी लागली होती. केवळ सोयाबीन, तूर व कपाशी पिके घेण्यात आली. यंदा २२ जूनला मान्सून धडकल्याने जमिनीतील उष्णता कमी होण्याची वाट पाहण्यात हा महिना निघणार आहे. त्यामुळे जुलैमध्येच खºया अर्थाने पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.१९५९ मध्ये २९ जूनला झाले होते आगमनसन १९५९ साली २९ जून रोजी मान्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. आजवरच्या इतिहासातील हे सगळ्यात उशिरा झालेले आगमन ठरले आहे. सन १९७२ मध्ये जरी दुष्काळ पडला असला तरी मान्सूचे आगमन आधीच झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.४८ तासांत  पाऊसछत्तीसगड आणि जवळच्या क्षेत्रावर असलेल्या चक्रीय वात स्थितीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ४८ तासांमध्ये मान्सून मुंबईसह उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ व्यापणार असल्याची माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम!काही दिवस पावसाचा आनंद मिळणार आहे. मात्र, पुढल्या आठवड्याच्या मधातच मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल