शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
4
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
5
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
6
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
7
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
9
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
10
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
11
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
12
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
13
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
14
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
15
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
16
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
17
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
18
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
19
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
20
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ : स्वच्छता रॅकिंगमध्ये विदर्भ माघारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:12 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये विदर्भ माघारला आहे.

 - प्रदीप भाकरेअमरावती  - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये विदर्भ चांगलाच माघारला आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत. एकीकडे ४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणीस प्रारंभ झाला असताना, विदर्भातील जिल्ह्याची अकराही शहरे पहिल्या शंभरात नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या त्यांच्या गुणांकनावर मोठा परिणाम होणार आहे. या देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात ४ हजारांपेक्षा अधिक शहरे सहभागी झाले आहेत. त्यात अमरावती महापालिकेचे डायनॅमिक रॅकिंग १३० असे समाधानकारक आहे,  तर बुलडाणा नगर परिषद ९८९ व्या क्रमांकावर आहे.          देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण केंद्राने हाती घेतले आहे. ५ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाचीतपासणी ४ जानेवारीपासून सुरू झाली असून, स्वच्छता अ‍ॅपच्या वापरासाठी त्यापैकी सुमारे ४०० गुण आहेत. स्वच्छता अ‍ॅप किती नागरिकांनी डाऊनलोड केलेत, वापरकर्त्यांचा सहभाग, संबंधित नागरी स्वराज्य संस्थेचे जबाबदारी व वापरकर्त्याचा अभिप्राय या चार घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४००० शहरांचे डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात येते. ११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी किती संख्येत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यावर अस्वच्छतेविषयक तक्रारी केले. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या तक्रारींची किती कालावधीत सोडवणूक केली व त्यानंतर संबंधित तक्रारकर्ता वा वापरकर्त्याने तक्रार व सोडवणुकीबाबत कसा अभिप्राय दिला, या चार घटकांवर ४०० गुणांची मदार आहे.केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे असेसर्स  स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीदरम्यान नागरिकांच्या अभिप्रायांसह स्थळनिरीक्षण करणार आहेत. त्यात स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून अस्वच्छतेविषयक तक्रारींची नेमकी कशी सोडवणूक करण्यात आली, याची तपासणी केली जाणार आहे. त्याचअनुषंगाने जाहीर झालेल्या स्वच्छता अ‍ॅपच्या डायनॅमिक रॅकिंगमध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांची शहरे माघारल्याने त्यांना स्वच्छता अ‍ॅपसाठी असलेल्या एकूण ४०० गुणांमधून किती गुण प्राप्त होतात, याकडे शहरवासीयांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

शहरनिहाय डायनॅमिक रॅकिंगअमरावती - १३०,अकोला - २५९, बुलडाणा - ९८९, यवतमाळ - १३१, वाशिम - ४०१, नागपूर - ८६९, वर्धा - ३०४, चंद्रपूर - २१२, भंडारा - ९४०, गोंदिया - ९८७ व गडचिरोली - ४५१

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानVidarbhaविदर्भ