शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

By admin | Updated: January 14, 2015 22:58 IST

स्थानिक पंचवटी चौकात आॅटोरिक्षाखाली चिरडून अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. किमया राजू मानकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती होलीक्रॉस मराठी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी होती.

अमरावती : स्थानिक पंचवटी चौकात आॅटोरिक्षाखाली चिरडून अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. किमया राजू मानकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती होलीक्रॉस मराठी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी होती. शहरातील बेशिस्त वाहतुकीनेच चिमुकल्या किमयाचा बळी घेतला अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी व्यक्त करीत आहेत. ही घटना बुधवारी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणेच बुधवारची सकाळ उगवली. शाळेत जाण्यासाठी तिची लगबगही नेहमीचीच. कडाक्याच्या थंडीतही शाळेच्या ओढीने पहाटे सातच्या आसपास ती घरातून निघाली. आईनेही तिला नेहमीप्रमाणेच निरोप दिला. पण, तिचा हसरा, टवटवीत चेहरा पुन्हा कधीच बघायला मिळणार नाही, याची पुसटशी कल्पनाही त्या माऊलीला नव्हती. ट्रकचालकाची माणुसकीघरातून उत्साहात बाहेर पडलेल्या किमयाला घरापासून हाकेच्या अंतरावर दबा धरून बसलेल्या मृत्यूने गाठले. पोलीस सूत्रानुसार, गाडगेनगर परिसरातील इंगोले प्लॉट येथील रहिवासी किमया मानकर ही होलीक्रॉस हायस्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिकत होती. बुधवारी सकाळी ७.१५ वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी सायकलने निघाली. पंचवटी चौकातील वळणावरुन शाळेच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातील भरधाव अज्ञात आॅटोरिक्षाने किमयाच्या सायकलला जबर धडक दिली. किमया सायकलसह फरफटत जाऊन नजीकच्या दुभाजकावर आदळली. आॅटोरिक्षा तिच्या अंगावरुन निघून गेली. या भयंकर अपघातात किमयाच्या शरीराच्या खालच्या भागाच्या चिंधड्या झाल्या. अपघातानंतर आॅटोरिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, ट्रक चालकाने रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या किमयाला पाणी पाजले. घटनेची माहिती तत्काळ गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी किमयाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारदरम्यान ७.४५ वाजता किमयाचा मृत्यू झाला.क्षणात थांबली ‘किमया’ची किलबिलघराचे चैतन्य असलेली किमया अतिशय समंजस होती. लहानग्या वयात ती प्रचंड काटकसरी होती. अभ्यासू किमयाचा असा दुर्देवी अंत झालाय यावर तिच्या आई-वडिलांचा विश्वासच बसेना. पंधरा मिनिटांपूर्वी घरातून हसत-खेळत शाळेकडे गेलेल्या किमयाला दिलेला निरोप शेवटचा असेल याची कल्पनाही तिच्या आईला नव्हती. त्यामुळेच किमयाच्या मृत्यूचा आघात तिची आई अर्चनाला सोसवत नव्हता. तिचा आक्रोश बघणाऱ्यांच्या काळजाला पिळ पाडत होता. तर किमयाची लहानगी ११ महिन्यांची बहिण केतकी निरागस परंतु गोंधळलेल्या डोळ्यांनी आई-वडिलांचा आक्रोश बघत होती. किमयाचे वडील राजू मानकर तर अपघातानंतर नि:शब्द झाले होते.