लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वडिलांसोबत जंगलात गुरे चरण्यास गेलेल्या रवि चरणदास अडमाने व स्वप्निल संजय पेठे हे जीवलग मित्र तृष्णातृप्तीकरिता विहिरीत उतरले. मात्र पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्राह्मणवाडा (गोविंदपूर) येथे घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर यांनी २६ मे रोजी या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली. सोबतच आर्थिक मदतही दिली.एक आमदार म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुमच्या अतीव दु:खात आपण सहभागी आहोत. झालेली हानी भरून निघणार नाही. मात्र संकटाला तोंड द्यावेच लागेल, असा धीर त्यांनी यावेळी दिला. हसत-खेळत सकाळी गेलेल्या या जीवलग मित्रांवर काळाने परतीच्या प्रवासात झडप घातली. निमित्त ठरले तृष्णातृप्तीकरिता विहिरीत उतरण्याचे. ज्या विहिरीत ते पाणी पिण्यासाठी उतरले त्याच पाण्याने त्यांचा घात केला.
तृष्णा क्षमविण्याच्या प्रयत्नात जीवलग मित्रांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:12 IST
वडिलांसोबत जंगलात गुरे चरण्यास गेलेल्या रवि चरणदास अडमाने व स्वप्निल संजय पेठे हे जीवलग मित्र तृष्णातृप्तीकरिता विहिरीत उतरले. मात्र पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्राह्मणवाडा (गोविंदपूर) येथे घडली.
तृष्णा क्षमविण्याच्या प्रयत्नात जीवलग मित्रांचा बळी
ठळक मुद्देदु:खाचा डोंगर : यशोमती ठाकूर यांची सांत्वना व आर्थिक मदत