शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

उपाध्यक्ष, सभापतीच्या बंगल्याची केली पाहणी

By admin | Updated: July 9, 2015 00:21 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांनी नियमांना बगल देत बंगल्याची डागडूजी, दुरुस्ती व सौदर्र्यींकरण केल्याप्रकरणी ...

जि.प. स्थायी समितीची भेट : दोन अभियंत्यांच्या अभिप्रायात तफावतअमरावती : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांनी नियमांना बगल देत बंगल्याची डागडूजी, दुरुस्ती व सौदर्र्यींकरण केल्याप्रकरणी बुधवारी स्थायी समितीने पाहणी करुन यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. परंतु या प्रकरणी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांनी दिलेल्या अभिप्रायमध्ये वेगवेगळे मत नोंदविल्याने नेमकी वास्तविकता काय? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जि.प. च्या दोन पदाधिकाऱ्यांनी निवासस्थानाच्या दुरूस्तीसाठी नियमबाह्य निधी मिळविल्याचे प्रकरण 'लोकमत'ने ५ जून रोजी लोकदरबारात मांडले होते. या वृत्ताची दखल तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी व जिल्हा परिषद स्थायी समितीने दखल घेतली होती. त्यानुसार बुधवारी स्थायी समितीचे पदाधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी कामांची संयुक्त पाहणी केली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश हाडोळे व बांधकाम, शिक्षण सभापती गिरीश कराळे यांनी शासकीय निवासस्थानाची दुरूस्ती करण्यासाठी निधी मिळविताना शासन निर्णयाची पायमल्ली केल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले होते. परिणामी जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती. सत्तेतील शिलेदारांनी शासकीय निवासस्थान दुरूस्तीसाठी केवळ ५ लक्ष रूपयांची तरतूद असताना या कामासाठी तब्बल ३० लक्ष रूपये खर्च केल्याची बाब उघडकीस आली. विकासाचे काम असो अथवा दुरूस्तीची कामे यासाठी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने कामे करण्यासाठी निकष ठरविले आहे. परंतु निकष गुंडाळून निवासस्थानामध्ये सुविधांसाठीच्या तरतुदीपेक्षा जिल्हा परिषदेच्या विविध शिर्ष्यनिहाय अखर्चिक असलेला निधी तुकडे पाडून निवासस्थाने दुरूस्ती केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद स्थायी समितीने १२ जून रोजी च्या सभेत या दोन्ही बंगल्याची संयुक्त पाहणी करण्याचा मुद्दा काँॅग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी मांडला होता. त्यानुसार ८ जुलै रोजी स्थायी समितीची सभा आटोपल्यानंतर जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे सदस्य रविंद्र मुंदे व बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय व्यवहारे आदींनी या बंगल्याची पाहणी केली. पदाधिकाऱ्यांची निवासस्थानाची कामे नियमानुसार केल्याची माहिती उपअभियंता संजय व्यवहारे यांनी दिली. यामध्ये तुटतुटक निधी वापरला असला तरी तो विविध कामेनिहाय घेण्यात आला. वेगवेगळी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. असा निधी वापरणे हे नियमानुसारच असल्याचे ते म्हणाले. तर कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत यांनी १२ जून रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत कोणतीही कामे करतांना तुटतुटक निधी वापरणे ही बाब शासन धोरणात न बसणारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. दोन्ही अभियंत्यांनी दिलेल्या अभिप्रायात तफावत आढळून आल्याने पडताळणी करण्याचे संकेत आहे. ही कामे नियमबाह्य होती, तर या कामांची देयके कार्यकारी अभियंत्यांनी कशी काढली, असे सतीश हाडोळे यांचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याची पाहणी केली केली असता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची सिईओ मार्फत पडताळणी क रून पुढील निर्णय घेऊ-बबलू देशमुख, गटनेता, काँॅग्रेस जि.प. ज्या प्रमाणे बंगला दुरूस्तीसाठी मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार निविदा काढून कामे केली आहेत. दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायामधील वेगवेगळे अभिप्राय यासंदर्भात दस्ताऐवजाची पडताळणी करू.-गिरीश कराळे, बांधकाम सभापती, जि.प. पदाधिकारी यांच्या बंगल्याची दुरूस्ती कामाला तत्कालीन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन भागात प्रशासकीय मान्यता दिल्याचे प्रशासकीय दस्ताऐवजावरून दिसून येते. त्यामुळे याबाबत तपासणी केल्यावरच याबाबत सांगता येईल-पी.जी. भागवत, कार्यकारी अभियंता, बांधकाम