फेऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसेसची साफसफाई
अमरावती : गत अडीच महिन्यांपासून मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य ८ आगारांच्या आवारात उभ्या असलेल्या बसची चाके १ जूनपासून पुन्हा फिरायला लागली आहेत. बरेच दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या बसेसची स्थिती दयनीय होण्याची शक्यता होती. मात्र, आगारात उभ्या असलेल्या बसेस चालू-बंद करून स्थितीची पडताळणी केली जात आहे.
एकाच जागेवर बस सुरू करून ठेवली जात असल्याने या बसेस सुस्थितीत दिसून येत आहेत. फेऱ्यांची संख्या वाढत असल्याने धूळखात असलेल्या बसेसची साफसफाई केली जात आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे एसटी महामंडळाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वर्षभरात एसटी बसेस कधी चालू तर कधी बंद अशी अवस्था आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्रेक द चेनचे नियम लागू झाल्यानंतर एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही फेऱ्या सुरू होत्या. बहुतांश बसेस एकाच ठिकाणी आगारात उभ्या होत्या. त्यामुळे या बसेस भंगार होण्याच्या स्थितीत पोहचल्या होत्या. परंतु एसटी महामंडळाने या बसेस काही वेळा सुरू ठेवल्या. त्यामुळे बसच्या इंजिनची स्थिती चांगली राहिली आहे. मात्र, अनेक बसेसच्या सीटवर धूळ जमा झालेली होती.
बॉक्स
जिल्ह्यात ८ आगार, १४ बसस्थानके
राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात ८ आगार आणि १४ बसस्थानक आहेत. या सर्व मिळून एसटी महामंडळाच्या सुमारे ३७५ बसेस आहेत. यात ४५ शिवशाही बसचा समावेश आहे. या सर्व बसेस आजघडीला चांगल्या स्थितीत असल्या तरी अनेक बसेस जुन्या आहेत.
बॉक़्स
आर्थिक अडचण
बॉक्स
आधीच दुष्काळ
वर्षभरापासून एसटी बसेस कधी सुरू, तर कधी बंद राहत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वर्षभरात लाखो रुपयांचा तोटा मामला झाला आहे. इतर विभागाकडील थकबाकी वसूल झालेली असल्यामुळे महामंडळाला हातभार लागला आहे.
बॉक्स
अत्यावश्यक सेवेसाठी १५ बसेस
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १२ ते १४ दिवस पूर्णत: एसटी महामंडळाची बससेवा बंद होती. उर्वरित वेळेत अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू होत्या. यामध्ये काही दिवस १० ते १२ बसेस सुरू होत्या.
कोट
बसेस एकाच ठिकाणी उभ्या राहत असल्याने बसची बॅटरी डिस्चार्ज होत होती. त्यामुळे बस दररोज सुरू करून बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे बस चांगल्या स्थितीत राहत आहे. पुढील काळात वाढती प्रवासी वाहतूक पाहता बसची मेंटेनन्सची कामे पूर्ण केली जात आहेत.
- श्रीकांत गभने,
विभाग नियंत्रक
बॉक्स
जिल्ह्यातील आगार -८
विभागातील बसेची संख्या ३७५