महागाई : भाववाढीने कोळमडले सर्वसामान्यांचे बजेटअमरावती : पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे. भाज्यांचा दराने प्रतिकिलो शंभरी गाठल्याने हेच का ते 'अच्छे दिन' अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहेत. डाळींच्या दरातही कोणतीही घट नसल्याने तूरडाळ सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. जून महिना संपल्यानंतरदेखील पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली असून अद्यापही ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात अद्यापपर्यंत मोठी दरवाढ कायम आहे. अमरावती शहरात नागपूर, नाशिक, औरंगाबाद व लगतच्या जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातूनही भाजीपाल्यांची आवक असते. परंतु ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी झाल्यानेच भाजीपाल्याच्या दरात वाढत झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी सांगितले. आवकवर अवलंबून असलेला भाजीबाजार आता पुढील किमान महिनाभरासाठी तरी धोक्यात आहे. विशेष म्हणजे घाऊक आणि किरकोळ दरातही प्रचंड फरक आहे. कॉटन मार्केट, भाजी बाजारातून शहराच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर आजूबाजूच्या भागात किरकोळ भाजी विक्रेते येथून घाऊक दरात घेऊन जातात. पण जून व जुलै महिन्यात भाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक कमी आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातून येणारी आवक रोडवल्याने बाहेरून भाजीपाला बोलवावे लागत आहे. मात्र यंदा बाहेरील भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात ४० ते ६० रुपये किलो असलेला सांभार सरसकट ४० रुपये पावाने विक्री होत आहे. १०० रुपये दिलेली मिरची ५० रुपये पावाने किंवा ३० रुपये किलोची भेंडी १५ रुपये पाव दराने विक्री होत आहे. केवळ काकडीचे दर बहुतांश प्रमाणात कमी आणि स्थिर आहे. (प्रतिनिधी)
डाळ, भाजीपाला महागच !
By admin | Updated: July 20, 2016 00:12 IST