पत्रपरिषद : जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचा आरोपअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच ८८ शाखा बंद आहे, सर्वच कर्मचारी संपावर आहेत. संपाचा पाचवा दिवस आहे. मात्र बँक व्यवस्थापन मात्र संघटनेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांसाठी हा संप आहे, असे सांगत असेल तर ह्या बँक व्यवस्थापनाच उलट्या बोंबा असल्याचा आरोप संघटनेद्वारा शुक्रवारी पत्रपरिषदेत केला.बँकेच्या सर्वच शाखा बंद आहेत. म्हणजेच १०० टक्के कर्मचारी संपात सहभागी, एककल्ली प्रशासनाने कुठलीच तडजोड केली नसल्याने शेतकरी, शिक्षक ठेवीदारांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याविषयी संघटनेद्वारा दिलगिरी व्यक्त करण्यात आली. बँक प्रशासनाद्वारा संपकरी महिला, पुरुष कर्मचाऱ्यांना बँकेमधून पाणी देऊ नये. मंडप टाकू देऊ नये. आदी विषयी प्रतिबंध करुन संकुचित मनोवृत्तीचे प्रदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगीतले. बँक शाखाच्या चाब्या जमा करण्याविषयी सूचना प्रसिध्द करण्यात आली मात्र संपावर असतांना अश्या प्रकारच्या चाब्या हस्तांतरीत करता येणार नाही. असे संघटनेद्वारा बँक प्रशासनाला कळविण्यात आले व बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते मान्य असल्याचे कबूल केल्याची माहिती संघटनेचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर यांनी सांगितले. औद्योगिक न्यायालयात अवार्ड पारित झाला असल्याने सहकारी बँकेच कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाद्वारा वेळोवेळी जाहीर केलेला भत्ता देणे बंधनकारक केले आहे. पत्रपरिषदेला अध्यक्ष व्ही.टी.टेकाडे, सोमवंशी, प्रभाकर किलोर उपस्थित होते.महागाईभत्ता बंधनकारकसंपावर तोडगा काढण्याकरिता सहाय्यक कामगार आयुक्त यांनी बँकेचे प्रशासन व कर्मचारी संघटना यांच्यात गुरुवारला समेट बैठक बोलाविली होती. बैठकीत चर्चेदरम्यान बँक कर्मचारी व संघटनेमध्ये झालेल्या करारानुसार केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेला महागाईभत्ता बँकेच्या कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक आहे, असे पत्र जिल्हा बँकेला दिले आहे. रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपणबँकेचे काही अधिकारी वैयक्तिकरित्या कर्मचाऱ्यांना फोन करुन धमक्या देवून रुजू होण्यासाठी दडपन आणित आहेत. याविषयी प्रशासनाला पत्र दिले आहे. शेतकऱ्यांना त्रास होते मात्र मागण्या मान्य झाल्यास प्रलंबीत कामाचा त्वरीत निपटारा करु. उशीरापर्यंत काम करु असे प्रभाकर किलोर यांनी सांगीतले.
बँक व्यवस्थापनाच्या उलट्या बोंबा
By admin | Updated: May 16, 2015 00:35 IST