शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

लसीकरण हे मोदी सरकारने दिलेल्या भूलथापांचे कॉकटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी देशात दररोज एक कोटी लसीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे यांनी केले. लसीकरणाच्या लक्ष्यापासून केंद्रातील भाजप सरकार भरकटले आहे.

ठळक मुद्देबबलू देशमुख, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन, राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोदी सरकारच्या लसीकरणाची रणनीती ही प्रचंड भूलथापांचे धोकादायक कॉकटेल आहे. सामान्यजनांच्या लुटीसाठीच या शासनाने समान लसीसाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या किमतीचे स्लॅब तयार केले. कोरोनाशी लढा देण्याच्या जबाबदारीपासून दूर गेलेल्या या सरकारने नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले, अशी टीका जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी देशात दररोज एक कोटी लसीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे यांनी केले. लसीकरणाच्या लक्ष्यापासून केंद्रातील भाजप सरकार भरकटले आहे. मे २०२० पासून इतर देशांनी लस खरेदीचे आदेश दिले, तर मोदी सरकारने जानेवारी २०२१ मध्ये या लसीचा पहिला आदेश दिला. आतापर्यंत १४० कोटी लोकसंख्येसाठी फक्त ३९ कोटी लस डोसचे आदेश दिले आहेत. लसींचे तीन स्लॅब पाडण्याऐवजी केंद्राने ती खरेदी करून राज्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे सभापती सुरेश निमकर, पूजा  आमले, दयाराम काळे, महेंद्रसिंग  गहरवाल, पंकज मोरे, सिद्धार्थ बोबडे  आदींची उपस्थिती होती. 

गती वाढवा, दररोज एक कोटी लसी द्या३१ मेपर्यंत २१.३१ कोटी लसी टोचल्या गेल्या असल्या तरी केवळ ४.४५ कोटी भारतीयांना लसीचे दोन्ही डोस प्राप्त झाले, जे लोकसंख्येच्या ३.१७  टक्के आहे. प्रतिदिन सरासरी १६ लक्ष डोस दिले तरी प्रौढांच्याच लसीकरणास तीन वर्षांहून अधिक कालावधी लागेल. त्याऐवजी केंद्र सरकारने दिवसाला एक कोटी लसीकरणाची गती राखणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस