शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

जपून वापरा सोशल मीडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे ‘सायबर सेफ वूमेन’ या मोहिमेत आयोजित कार्यशाळा शुक्रवारी विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडली, याप्रसंगी बाविस्कर बोलत होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सायबर सुरक्षेबाबत आवाहन प्रसारित करण्यात आले.

ठळक मुद्देसंजयकुमार बाविस्कर : महिला सुरक्षेची जागर मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोशल मीडिया हाताळताना प्रत्येकाने लक्ष्मणरेषा आखून घेणे आवश्यक आहे. सतत सजगता हाच सुरक्षिततेचा उपाय आहे. सायबर सुरक्षिततेचा हा संदेश प्रत्येक माता-भगिनीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले.अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे ‘सायबर सेफ वूमेन’ या मोहिमेत आयोजित कार्यशाळा शुक्रवारी विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडली, याप्रसंगी बाविस्कर बोलत होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सायबर सुरक्षेबाबत आवाहन प्रसारित करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुसुम साहू, महिला व बालकल्याण सभापती वंदना हरणे, सुनीता भेले, सुरेखा लुंगारे, प्राचार्य स्मिता देशमुख, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, दिशा संस्थेच्या ज्योती खांडपासोळे, पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले आदी उपस्थित होते. यावेळी चाइल्ड लाइनचे दिनेश कपूर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी प्रास्ताविक, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी संचालन केले, तर जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. सहायक पोलीस निरीक्षक हेरोळे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महिला कार्यकर्ता, विद्यार्थिनी, अधिकारी उपस्थित होते.आक्षेपार्ह पोस्टविषय पोलिसांना कळवादुर्लक्ष वा चुकीच्या बाबी सहन करीत राहण्याची वृत्ती टाळून कुठलीही आक्षेपार्ह बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना कळवावे. समाज माध्यमे हाताळताना अनोळखी व्यक्तींना फ्रेंड लिस्टमध्ये स्थान देता कामा नये. शेअर केलेली माहिती, फोटोला अधिक लाईक मिळण्याची भुरळ पडू देऊ नये. कारण गैरहेतूने जवळीक साधण्याचाही प्रयत्न गुन्हेगारी व्यक्तींकडून केला जातो. त्यामुळे वेबसाइटच्या सेंटिंग्जमध्ये जाऊन सिक्युरिटीचे भक्कम पर्याय निवडणे, अनावश्यक माहिती शेअर न करणे, बॅकअप ठेवणे व पालकांचे नियंत्रण गरजेचे आहे, अशी माहिती सायबरचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली.सायबर सेलचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनदुसºया सत्रात सायबर सेलचे निरीक्षक प्रवीण काळे व ज्योती खांडपासोळे यांनी कार्यशाळेत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सायबर सुरक्षा व सार्वजनिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. सायबर ग्रुमिंग, सायबर बुलिंग, मॉर्फिंग, सायबर डिफेमेशन, स्टॉकिंग, आॅनलाइन गेमिंग, फिशिंग, सेक्सॉर्टशन, स्कूटिंग अशा विविध सायबर गुन्हे प्रकारांची माहिती दिली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया