वन्यप्राण्यांना हुसकाविण्यासाठी कार्बाईडचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:07+5:30

पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, चिक्कारा, माकड, रानडुक्कर, भेडकी, सांबर यासारखे वन्यप्राणी दचकून दूर पळतात.

The use of carbide to drive away wildlife | वन्यप्राण्यांना हुसकाविण्यासाठी कार्बाईडचा वापर

वन्यप्राण्यांना हुसकाविण्यासाठी कार्बाईडचा वापर

Next
ठळक मुद्देपोहरा जंगल : वनरक्षकाचा प्रयोग, अवघा २०० रुपये खर्च, शेतकऱ्यांकडूनही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वर्तुळातील उत्तर चिरोडी बीट वनखंड २९८ मधील ३३ कोटीतील रोपवनातून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जात आहे. देशी जुगाडातून वरुडा बीटचे वनरक्षक अतुल धस्कट यांनी यासाठी बंदुक ताणली असून, या बंदुकीच्या प्रचंड आवाजाने वन्यप्राणी रोपवनातून पळत असल्याचे चित्र आहे.
याआधी शेतकरी रोही, हरिण, चितळ, चिक्कारा, माकड, रानडुक्कर, भेडकी, सांबर हाकलण्यासाठी शेतकरी हा प्रयोग करीत होते. मात्र पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, चिक्कारा, माकड, रानडुक्कर, भेडकी, सांबर यासारखे वन्यप्राणी दचकून दूर पळतात.
रोपे संरक्षणासाठी वनरक्षकाने लढविली शक्कल
या बंदुकीमध्ये कार्बाईडचा एक खडा टाकून त्यावर तोडे पाणी टाकल्याने बंदुकीमध्ये पाण्याची वाफ तयार होते व त्यानंतर मागील भागात लावलेल्या लायटरने स्पार्किंग होऊन त्यातून मोठा आवाज एकिवास येतो. या आवाजामुळे वन्यप्राणी दचकून रोपवनातून पळ काढतात. सुरुवातीला त्यांनी दुकानातून एक तीन फूट लांबी व अडीच इंच गोलाई असलेला व दुसरा दीड फूट लांबी व दोन इंच गोलाई असलेले असे दोन पीयूसी पाईप, एक लायटर व अडिच बाय दोनची कपलिंग खरेदी केली. सर्वप्रथम तीन फूट लांबीच्या पाईपाला दीड फूट लांबीचा पाईप जोडून पुढच्या भागाला कपलिंग जोडले व रेती आकाराचा खडा टाकण्यासाठी ३ फुटांच्या पाईपाला मध्यभागी छिद्र तयार केले व मागील भागात प्लास्टिकचे झाकन लावून त्याला छिद्र पाडून त्यामध्ये लायटर जोडण्यात आले. अशाप्रकारे दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये ही बंदुकीची यंत्रणा तयार केल्याचे अतुल धस्कट म्हणाले.

Web Title: The use of carbide to drive away wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.