शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

महामार्गावर विनाक्रमांकाचे ट्रक सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आहेत. मार्गक्रमण करताना कुठलीही अडचण निर्माण होत नसल्याने अशा वाहतुकीला ज्वर चढला आहे. विशेष म्हणजे, विना क्रमांकाची वाहने धावत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : महामार्गावर अवैध गौण खनिज असो वा अवैध गोवंश वाहतूक, हा विषय आता नवीन राहिला नाही. प्रशासनाने कितीही कठोर पावले उचलली तरी या अवैध वाहतुकीची तस्करी करणारे प्रशासनाच्या दोन पावले पुढेच असल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. कारण सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आहेत. मार्गक्रमण करताना कुठलीही अडचण निर्माण होत नसल्याने अशा वाहतुकीला ज्वर चढला आहे. विशेष म्हणजे, विना क्रमांकाची वाहने धावत आहेत. एकाच नंबरची दोन-तीन वाहने चालविण्यातही अनेक पटाईत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनाने रस्त्यावर काही अघटित घडल्यास पोलीस कारवाई कशी करणार,  असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

सीसीटीव्हीचा उपयोग काय? महामार्गालगत पोलीस ठाणे आहे. वाहन क्रमांकाच्या पाटीसाठी सर्वसामान्य चालकांना दंडित केले जाते. मात्र, एवढी मोठी वाहने नजरेसमोरून अप-डाऊन करीत असताना निदर्शनास येत नसतील, तर पोलीस ठाण्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचा उपयोग काय, हा प्रश्नच आहे.

महामार्गावर विना क्रमांकाची मालवाहू वाहने अद्याप निदर्शनास आली नाहीत. यानंतर कटाक्षाने लक्ष घालून अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल व वरिष्ठांना अवगत करण्यात येईल.  - शंकर मावसे, महामार्ग वाहतूक पोलीस 

 

टॅग्स :sandवाळूtraffic policeवाहतूक पोलीस