शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विद्यापीठ अभियांत्रिकी, फार्मसी परीक्षा 13 जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

विद्यापीठ अंतर्गत २३ अभियांत्रिकी, तर १८ फार्मसी महाविद्यालयांत परीक्षांचे केंद्र असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. १३ ते २७ जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी, फार्मसी परीक्षांचे नियोजन केले आहे. हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे एमसीक्यू पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बेमुदत संपामुळे स्थगित झालेल्या  परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यापीठ अंतर्गत २३ अभियांत्रिकी, तर १८ फार्मसी महाविद्यालयांत परीक्षांचे केंद्र असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. १३ ते २७ जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी, फार्मसी परीक्षांचे नियोजन केले आहे. हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.यंदा महाविद्यालये सुरळीत झाले असताना ओमायक्रॉनचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्द्धतीने घेतल्या जाणार आहेत.दरम्यान, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज प्रभावित झाले आहे. यामुळे ३ जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. 

अभियांत्रिकी परीक्षांचे नियोजन- बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग सेमिस्टर - ५ (सीबीसीएस) सकाळी १० ते ११- शाखा : सिव्हिल इंजिनीअरिंग (सीई), मेकॅनिकल इंजिनीअरिंग (एमई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (ईई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईपी), इलेक्ट्रिकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (ईएक्स), इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटीसी), कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (केएस), कम्प्यूटर इंजिनीअरिंग (केई), इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)

-बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग सेमिस्टर - ७ (सीबीसीएस) दुपारी १२ ते १- शाखा : सिव्हिल इंजिनीअरिंग (सीई), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (एमई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पाॅवर) (ईपी), इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (ईएक्स), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईएल), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (ईई), इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटी), कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (केएस), कम्प्यूटर इंजिनीअरिंग (केई), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)

- बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग सेमिस्टर - ८ (सीजीएस)- शाखा : सिव्हिल इंजिनीअरिंग (सीई), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (एमई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईपी), इलेक्ट्रिकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (ईएक्स), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईएल), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (ईई), इलेक्ट्रॉनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटी), कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (केएस), कम्प्यूटर इंजिनीअरिंग (केई), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)

हिवाळी २०२१ अभियांत्रिकी, फार्मसी, भेषजी शाखांच्या परीक्षा १३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ

फार्मसी विषयनिहाय परीक्षांचे नियोजन- बी.फार्म. सेमिस्टर ५ (सीबीएसएस) - सकाळी १० ते ११ - बी.फार्म.  सेमिस्टर ७ (सीबीएसएस) - दुपारी१२ ते १- बी.फार्म.  सेमिस्टर ८ (सीबीएसएस) - दुपारी २ ते ३- डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी.) पार्ट ५ - दुपारी १२ ते १

 

टॅग्स :universityविद्यापीठ