शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचा ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास नकार; प्राचार्यांना पाठविली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:37 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

ठळक मुद्दे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.प्राचार्यांना नोटिसी बजावून या अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे सोपविण्यात आली आहेत. 

गणेश वासनिकअमरावती, दि.6 - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. प्राचार्यांना नोटिसी बजावून या अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे सोपविण्यात आली आहेत. 

अमरावती विद्यापीठांतर्गत यवतमाळ, वाशिम, बुलडाणा,अकोला व अमरावती या पाच जिल्ह्यांत एकूण ४१० महाविद्यालये आहेत. मात्र, पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांत ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेशित विद्यार्थी संख्या आहे. परंतु महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थी संख्या कमी असतानासुद्धा हे अभ्यासक्रम सुरूच ठेवतात. ही बाब कुलगुरुंनी गठित केलेल्या त्रीसदस्यीय समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा कमी महाविद्यालयात शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेची जबाबदारी आता त्याच महाविद्यालयांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

विद्वत परिषदेच्या शिफारशीनुसार तीन किंवा त्यापेक्षा कमी महाविद्यालयांत शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची परीक्षा संबंधित महविद्यालयांनी संचालित आणि कार्यान्वित करण्यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी त्रीसदस्यीय समिती गठित केली होती. सदर समितीच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने २० जून २०१७ रोजी ही बाब विषय क्रमांक १४० वरील चर्चेच्या अनुषंगाने मान्य केली. त्यामुळे आता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्यास त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे संचलन त्या-त्या महाविद्यालयांना करावे लागेल. 

या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांवर गंडांतर आले आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे आता महाविद्यालयांनाच करावे लागतील. ही बाब प्राचार्यांना पाठविलेल्या नोटीशीद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच ज्या अभ्यासक्रमांना मागील तीन वर्षांपासून विद्यार्थी प्रवेशित नसतील किंवा जे अभ्यासक्रम बंद झालेत, याबाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनाला तत्काळ सादर करण्याच्या सूचना प्राचार्यांना दिल्या आहेत.

‘दोन किंवा तीन महाविद्यालयात सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करताना तितकेच मनुष्यबळ लागते. त्यामुळे आता कमी विद्यार्थी संख्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेची जबाबदारी त्याच महाविद्यालयांवर सोपविली आहे. कुलगुरूंच्या आदेशानुसार प्राचार्यांना नोटिसी बजावल्या आहेत.- जयंत वडते, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

ही असेल महाविद्यालयांवर जबाबदारीविद्यार्थ्यांकडून परीक्षा आवेदनपत्रे भरून घेणे, प्रश्नपत्रिकांची छपाई करणे, परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रिका व प्रमाणपत्र वितरण यांसह परीक्षेशी निगडित कामे महाविद्यालयांनाच करावे लागतील.