अचलपूर : गिरणी कामगार संघाशी संलग्न भारतीय मजदूर संघाच्या अचलपूर येथील संघटनेच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांची भेट घेऊन फिनले मिल सुरू करण्याची मागणी केली. ना. गडकरी यांनी निवेदनाची त्वरित दखल घेऊन लगेचच केंद्रीय सचिवस्तरावर बोलणे करून फिनले मिल त्वरित सुरू करण्याची प्रक्रिया करण्याचे आदेश दिले तसेच कोरोनाकाळातील फिनले मिलमधील कामगारांना पूर्ण वेतन देण्याकरिता निर्देश दिले. शिष्टमंडळामध्ये शिल्पा देशपांडे, गजानन गटलेकर, हर्षल ठोंबरे, सुरेश चौधरी, अभय माथने, मनीष लाडोळे, धर्म राऊत, राजा ठाकूर, दिनेश उघडे, नरेंद्र बोरकर, सचिन फिस्कर उपस्थित होते.
---------------
शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या
फोटो - मानकर २६ पी
दर्यापूर : दर्यापूर मतदारसंघात ११ जुलै च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतजमीन खरडून गेली व पिके जळाली. शेतकऱ्यांना नुकसानाची सरसकट नुकसानभरपाई द्या, अशी मागणी आमदार बळवंत वानखडे यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली. ना. भुसे हे २५ जुलै रोजी अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या ना. भुसे यांनी २५ जुलै रोजी दर्यापूर येथे आढावा बैठक घेतली.
-----------------
बेनोडा ग्रामवासयांचे सहाय्यक अभियंत्यांना अल्टिमेटम
बेनोडा (शहीद) : विजेच्या लपंडावाचा त्रास कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेनोडा ग्रामवासीयांनी सहायक अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. गावातील ११ केव्हीचा पुरवठा वारंवार बंद पडतो. ग्राहकांना ब्रेक डाऊन असल्याचे सांगितले जाते. मात्र, वितरण कंपनीने यावर्षी मान्सूनपूर्व मेंटेनन्सवर सर्रास दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रणीत कुबडे, अनूप कट्यारमल, योगेश फरकाडे, धर्मेंद्र गोहाड, योगेश यावले, संजय पवार, नीलेश पोहरकर, सूरज खसारे, रूपेश नेहारे आदींनी केला.
----------------
पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कावली वसाड : परिसरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होता. ढग येत होते, पाऊस मात्र कोसळत नव्हता. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी, कोबी या पिकांची रोपे पाणी देऊन जगवली. आता गेल्या चार पाच दिवसापासून पाऊस आल्याने सर्वच पिकांना जीवदान मिळाले असल्याचे शेतकरी बोलत आहे. संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. लहान-मोठ्या नाले पहिल्यांदाच वाहू लागलेले नागरिकही आनंदी झाले आहे.
-----------------
फोटो - मनोहरे २६ पी
अंजनसिंगीतील सिमेंट रोडचे काम संथ गतीने
अंजनसिंगी : यवतमाळ-रिद्धपूर रस्त्यावर गावातून काँक्रीटीकरण संथगतीने होत आहे. आतापावेतो तीनशे ते चारशे फुटापर्यंत काम झाले आहे. अर्धवट कामामुळे वाहनधारकांना व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, तिवसा यांनी रस्ता किती फुटांचा आहे, याची आखणी करून ग्रामपंचायतीला माहिती द्यावी तसेच तसेच दुभाजकासह काँक्रीटीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी सरपंच रूपाली गायकवाड व ग्रामस्थांनी केली आहे.