शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बोअरवर धाड तहसीलदाराशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:29 IST

ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देसावरखेड येथील घटना । सात जणांविरुद्ध गुन्हा, दोन मशीन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तहसीलदार गणेश माळी यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांकडून सात जणांविरुद्ध भादंविचे कलम १८८, ३५३, व महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन २००९ मधील सहकलम ५२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींमध्ये राजेश खेरडे (रा. अंबाडा, ता. मोर्शी), पांढºया रंगाच्या विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा चालक, चारचाकी वाहनातील एक अनोळखी इसम, केए ४० एम ३८९१ क्रमांकाच्या बोअर मशीनचा चालक चिनातंबी, केए ४० / ९३०९ क्रमांकाच्या बोअर मशीनचा आरमुगम तसेच दोन्ही वाहनांच्या मालकांचा समावेश आहे.सावरखेड हे गाव अतिशोषित (ड्राय झोन) असल्याने तेथे बोअर करण्यास मनाई आहे. तहसील प्रशासनाचा मनाई हुकूम डावलून सावरखेड येथे कमलसिंह चितोडिया यांच्या घराच्या मागे असलेल्या गट क्रमांक ६६९ या शेतात विनापरवाना अवैधरीत्या बोअर सुरू असल्याची माहिती मोर्शीचे तहसीलदार गणेश माळी यांना मिळाली. त्यानुसार ते पथकासह १३ जूनला रात्री ११.३० च्या आसपास सावरखेड येथे पोहोचले. तेथून बोअर करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन वाहने जप्त करून त्यांनी चौकशी आरंभली.शिवारात दाखल झालेल्या केए ४० एम ३८९१ क्रमांकाच्या बोअर मशीनचा चालक चिनातंबी, केए ४० / ९३०९ क्रमांकाच्या बोअर मशीनचा चालक आरमुगम यांच्याकडे त्यांनी बोअर करण्याबाबतच्या परवान्याची विचारणा केली. दोघांकडेही बोअर करण्याबाबतचा वैध परवाना आढळून न आल्याने दोन्ही बोअर मशीन जप्त करण्यात आल्या.वाहनचालकांना ती वाहने मोर्शी तहसील कार्यालयात नेण्याची सूचना देऊन तहसीलदार आपल्या वाहनात बसून शिवाराबाहेर पडले. त्यानंतर त्यांना अडविण्यात आले. याप्रकरणी तहसीलदार माळी यांनी पहाटे पाचच्या सुमारास तक्रार दाखल केली. या घटनेची चर्चा महसूल मंडळात गाजत असून, माफियाच्या शिरजोरीबाबत चिंता व्यक्त होत आहे.घटनाक्रमजप्त केलेली दोन्ही वाहने शेताबाहेर येताच विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनातून तीन इसम आले. त्यांनी त्यांचे वाहन बोअर मशीनच्या आडवे लावले. तहसीलदार गणेश माळी यांच्याशी हुज्जत घालत आरोपी राजेश खेरडे याने पंचनाम्याच्या प्रती आत्ताच द्या, गाड्या माझ्या मालकीच्या असून, त्या तुम्हाला नेऊ देणार नाही, काय करायचे आहे ते करा, असे बजावले. आरोपी खेरडे हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सुरू असलेली बोअर वाहने बंद करुन बळजबरीने वाहनचालक व कामगारांना शिवारातून बाहेर पाठविले. आरोपीस अटकाव केल्यानंतरही त्याने बळाचा वापर करीत तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांशी हुज्जत घातली आणि सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा घटनाक्रम पुढे आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई