आॅनलाईन लोकमत:अमरावती : भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर नजीकच्या मधालापूर-म्हैसपूर फाट्यावर भरधाव दुचाकी एकमेकींवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.अब्दुल अतीक शेख जलीब (२८) व सतीश लाहळे (२२) अशी मृतांची नावे आहेत. तर सुरेश शर्मा (२०, तिघेही राहणार धामोरी) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार सतीश व सुरेश शर्मा हे दुचाकीने वाठोडा शुक्लेश्वरहून धामोरीकडे जात होते, तर धामोरीवरून वाठोडाकडे येत असलेल्या अब्दूल अतीक शेख याच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले. यात अब्दुल व सतीश लाहोळे यांचा उपचारादरम्यान जिल्हा रु ग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा तपास खोलापूर पोलिस करीत आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी गावातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
अमरावती जिल्ह्यात दुचाकींची धडक, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 14:22 IST
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर नजीकच्या मधालापूर-म्हैसपूर फाट्यावर भरधाव दुचाकी एकमेकींवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
अमरावती जिल्ह्यात दुचाकींची धडक, दोघांचा मृत्यू
ठळक मुद्देमधालापूर-म्हैसपूर फाट्यावरील घटना