शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वस्तीतून दुचाकी तीन किलोमीटर नेली फरफटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

गुरुदेवनगरातील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये वाशिम जिल्ह्यातील महेंद्र बापूराव बसवनाथे हे सहकुटुंब रोजगाराच्या निमित्ताने भाड्याने राहतात. त्यांची एमएच २९ एव्ही ८०३९ क्रमांकाची दुचाकी घराबाहेर उभी होती. बेफाम वेगाने आलेल्या एमएच २७ एसी ३१३९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने बसवनाथे यांच्या दुचाकीला धडक दिली, शिवाय पुढल्या भागात अडकलेली ही दुचाकी फरफटत नागरी वस्तीतून महामार्गावर आणली व अविश्वसनीयरीत्या तब्बल तीन किलोमीटर घासत नेली.

ठळक मुद्देगुरुदेवनगरातील घटना, पाठलाग करून नागरिकांनी चालकाला पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज (मोझरी) : गुरुदेवनगर येथे सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता नागरिकांसाठी चिंताजनक असा विचित्र अपघात घडला. नागरी वस्तीतून एका चारचाकी वाहनाने दुचाकी तीन किलोमीटरवर फरफटत नेली. नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडले. गुरुदेवनगरातील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये वाशिम जिल्ह्यातील महेंद्र बापूराव बसवनाथे हे सहकुटुंब रोजगाराच्या निमित्ताने भाड्याने राहतात. त्यांची एमएच २९ एव्ही ८०३९ क्रमांकाची दुचाकी घराबाहेर उभी होती. बेफाम वेगाने आलेल्या एमएच २७ एसी ३१३९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने बसवनाथे यांच्या दुचाकीला धडक दिली, शिवाय पुढल्या भागात अडकलेली ही दुचाकी फरफटत नागरी वस्तीतून महामार्गावर आणली व अविश्वसनीयरीत्या तब्बल तीन किलोमीटर घासत नेली. नागरीकांनी या वाहनाचा पाठलाग करून शेदोळा खुर्द येथील उड्डाणपुलानजीक पकडले. हे वाहन माहुली जहागीर येथील रहिवासी मो. फैजान अब्दुल कलाम (२६) हा चालवत होता, असे तिवसा पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या विचित्र अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरला असून, या घटनेने गुरुदेवनगरवासी कमालीचे हादरले आहेत. नागरिकांची सुरक्षा दिवसाढवळ्या धोक्यात आल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली.

 

टॅग्स :Accidentअपघात