लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर आष्टगाव ते वरला दरम्यान दोन दुचाकी धडकल्याने युवक ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. चांदूर बाजार तालुक्यातील चार युवक एमएच २७ एवाय ५८६१ व एमएच २७ सीएफ ६९८१ या दुचाकीनी मोर्शीला येत होते. परंतु, अष्टगाव ते वरलादरम्यान दुचाकीची धडक होऊन नितीन नामदेव नांदणे (२३, रा. कुरळपूर्णा) हा जागीच ठार झाला. अविनाश भानगे (२४, रा. खैरी दानोडा), ऋषीकेश पवार (२३, रा. येलकीपूर्णा) व रोशन नान्हे (२७, रा. हिरूळपूर्णा) हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. ठाणेदार मोहंडुले यांनी घटनास्थळ गाठले. तुषार पोहकर यांची खासगी ॲम्बुलन्सद्वारे मृतासह जखमी युवकांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणले. मृत नितीनचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर अमरावतीत हलविण्यात आले.
आष्टगाव ते वरला दरम्यान दुचाकी धडकल्या, युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST