शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर औरंगाबाद हायवेवर दोन ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 14:33 IST

शिंगणापूर फाट्यानजीकची घटना

अमरावती : नागपूर औरंगाबाद हायवेवरील शिंगणापूर फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना  काल (दि. ४) रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात तीन जण ठार झाले.

औरंगाबादकडून नागपूरकडे कांदा वाहून नेणारा ट्रक (सी जी 04 एच झेड 8154) व नागपूरकडून औरंगाबादकडे लोखंडी रॉड वाहून नेणारा ट्रक (आर जे 04 सीजी 2258) हे दोघेही समोरासमोर धडकल्याने हा अपघात घडला.

ही घटना कळताच नांदगावचे ठाणेदार विशाल पोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे, विवेक राणे, गोपाल तायडे व नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. औरंगाबादकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकमधील जखमी वाहक सर्वेश कुमार यादव वय 36 याला उपचारासाठी येथील दवाखान्यात नेण्यात आले होते, पण तो दगावला. तसेच नागपूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकमधील चालक व वाहक दोन्ही या अपघातात जागीच ठार झाले.

हा अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही ट्रकचा पुढील भागाचा पार चेंदामेंदा झाला. ट्रकमधील चालक - वाहक दोघांचे मृतदेह ट्रकमध्ये अडकले होते. त्यांना काढण्यासाठी अमरावती महानगरपालिकांचे वरड वाहन व अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावण्यात आले. या दोन्ही मृतकाचे नाव वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलीस तपास पो. कॉ. विवेक राणे हे करत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती