शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या कारागृह विभागात नव्याने दोन हजार पदे निर्माण होणार

By गणेश वासनिक | Updated: October 6, 2023 21:39 IST

गृह खात्याचा निर्णय, शासनादेश जारी, ६० कारागृहांमध्ये रिक्तपदांचा तिढा सुटणार.

गणेश वासनिक, अमरावती : राज्याच्या कारागृह विभागात हल्ली मंजूर पदांव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण केली जाणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी गृह खात्याने मंजुरी दिली असून, शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये रिक्तपदांचा तिढा सुटण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

‘लोकमत’ने यापूर्वी सातत्याने 'कारागृहातील रिक्तपदांचे ग्रहण', 'कारागृहे कैद्यांनी हाउसफुल', 'दीड वर्षात आठ हजार कैदी वाढले' अशा आशयांची वृत्ते प्रकाशित करून अधिकारी- कर्मचारी रिक्तपदांचा गंभीर विषय शासन दरबारी निदर्शनास आणून दिला. अखेर गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गांत नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. या शासनादेशात कारागृह महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आधार घेण्यात आला आहे.अशी मिळाली दोन हजार नव्याने वाढीव पदांना मंजुरी

राजपत्रित गट 'अ' : १ विशेष कारागृह महानिरीक्षक, २ अधीक्षक मध्यवर्ती कारागृह, ७ मानसशास्त्रज्ञ, १६ मनोविकृतीशास्त्रज्ञ. राजपत्रित गट 'ब' : ७ जिल्हा कारागृह अधीक्षक, ९ वैद्यकीय अधिकारी (वर्ग २), २ सहायक/ प्रशासन अधिकारी.

अराजपत्रित गट 'क' : २६ वैद्यकीय अधिकारी (वर्ग ३). ५ कार्यालय अधीक्षक, ४५ तुरुंग अधिकारी (श्रेणी १). ११६ तुरुंग अधिकारी, २१ मिश्रक, १२ वरिष्ठ लिपिक, २१ लिपिक, ७ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ५६ सुभेदार, २७७ हवालदार, १,३७० कारागृह शिपाई (महिला, पुरुष), तर १० परिचालक.

टॅग्स :jailतुरुंग