शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कोटी रुपये अखर्चित निधी! शासननिर्णयानंतरही कार्यवाहीला केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 16:37 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक वर्षात मिळालेला निधी खर्च न झाल्यास अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करणे अनिवार्य असून, तसे वित्त विभागाचे ६ जून २००८ रोजी शासन आदेशसुद्धा आहे. मात्र, नगर विकास विभागाशी संबंधित महापालिका, नगरपंचायत, नगर परिषदांनी सन २००८ पासून सुमारे दोन हजार कोटी रुपये अखर्चित असलेला निधी शासनतिजोरीत जमा केला नाही.

- गणेश वासनिक

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक वर्षात मिळालेला निधी खर्च न झाल्यास अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करणे अनिवार्य असून, तसे वित्त विभागाचे ६ जून २००८ रोजी शासन आदेशसुद्धा आहे. मात्र, नगर विकास विभागाशी संबंधित महापालिका, नगरपंचायत, नगर परिषदांनी सन २००८ पासून सुमारे दोन हजार कोटी रुपये अखर्चित असलेला निधी शासनतिजोरीत जमा केला नाही. परिणामी राज्याचा नगरविकास विभाग वित्त मंत्रालयाच्या निर्णयाला जुमानत नसल्याचे वास्तव आहे.यापूर्वी राज्यात २६ महापालिका, १०९ नगरपंचायती, २५६ नगर परिषदांनी सन २००८ पासून अखर्चित असलेला निधी शासनतिजोरीत जमा केला नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे वित्त विभागाने २८ जून व २१ सप्टेंबर २०१७ रोजी स्वतंत्र दोन शासननिर्णय जारी करून महापालिका, नगरपरिषदांनी परिशिष्टनिहाय अखर्चित निधीची माहिती नमूद करून ते शासनतिजोरीत जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, मुख्य लेखाधिकारी यांनी दिले होते. परंतु, नगर विकास मंत्रालय हे मुख्यमंत्र्यांकडे असल्याने या विभागाने वरिष्ठ अधिकारी अन्य विभागाला जुमानत नाहीत. त्यामुळे वित्त मंत्रालयाने दोन शासन आदेश जारी केल्यानंतरही महापालिका, नगरपरिषदांनी अखर्चित निधी शासनाकडे जमा केलेला नाही. हा शिरस्ता कायम असल्याने शासनाचे दोन हजार कोट्यवधी रूपये अखर्चित पडून असल्याची माहिती आहे. आर्थिक विषयाशी संबंधित कोणतेही आदेश जारी करताना किंवा निर्णय घ्यायचा असल्यास वित्त विभागाची संमती आवश्यक आहे. मात्र, नगर विकास विभागाने सोमवार, १२ मार्च २०१८ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना मंजूर निधीच्या विनियोगाबात मार्गदर्शक तत्वे ठरवून देताना वित्त विभागाला विश्वासात घेतले नाही. महापालिका, नगर परिषदांकडे असलेला अखर्चित निधी तात्काळ व कोणत्याही परिस्थितीत शासन तिजोरीत जमा करण्याचे परस्पर आदेश जारी केले आहे. महापालिका, नगर परिषदांकडे सन २००८ ते २०१७ पर्यंत किती कोटी रुपये निधी अखर्चित आहे, हे नगर विकास ठामपणे सांगू शकत नाही. दरवर्षी शासनाकडून हजारो कोटी रुपये विकासकामांच्या नावे येतात. परंतु, ते नियमानुसार खर्च झाले किंवा नाही, हे तपासून पाहण्याची जबाबदारी लोकल आॅडिट फंडकडे आहे. परंतु, शासननिर्णय डावलून निधी खर्च होत असताना अखर्चित निधीबाबत लोकल आॅडिट फंड कोणत्याही प्रकारचे लेखाआक्षेप नोंदवित नाही. परिणामी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आजतागायत सुरू आहे.    

लोकलेखा समितीला अंधारात ठेवण्याचा डावमहापालिका, नगर परिषद किंवा जिल्हा परिषदांमध्ये विकास कामांवर खर्च होणाºया निधीबाबत लेखापरीक्षण दरम्यान ‘आॅलवेल’ असल्याचे दर्शविले जाते. त्याकरिता लोकल आॅडिट फंड ‘मॅनेज’ केले जाते. कारण लेखाआक्षेप नोंदविल्या गेल्यास ही बाब लोकलेखा समितीच्या निदर्शनास येत नाही. परिणामी वर्षांनुवर्षे लोकल आॅडिट फंड आपल्या अधिकाराचा असाच दुरुपयोग करीत असून, लोकलेखा समितीला या माध्यमातून अंधारात ठेवण्याचा हा डाव रचला जात आहे.     वित्त विभागाने मागितलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखर्चित निधीबाबतची आकडेवारी पाठविली आहे. ही आकडेवारी कोट्यवधींचा घरात असून, अहवालरूपात शासनाकडे सादर केली आहे.- प्रताप मोहिते संचालक, लोकल आॅडिट फंड, महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती