शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

दोन चिमुकले पुरात वाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:01 IST

नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकाटआमला पुलावरील घटना : शाळा पाहून घरी येत होते परत

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. तब्बल दहा तासांनंतर मुलीचा मृतदेह हाती लागला, तर मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बहाद्दरपूर येथील जगदीश चौरे (३५) हे मुलगी धनश्री (११), मुलगा नैतिक (७) व वडील मारूती चौरे (६०) यांसह बुधवारी दुचाकीने बडनेऱ्याला आले होते. मुलांची शाळा पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी शालेय साहित्य घेतले आणि दुचाकीने गावाकडे निघाले. रात्री ८ वाजता ते काटआमलाच्या नाल्यावरील पुलानजीक पोहोचले. पाऊस सुरू असल्याने या पुलावरून पाणी वाहत होते. नेहमीचा रस्ता आहे; सहज निघून जाऊ, या बेतात जगदीशने दुचाकी नेली. मात्र, नाल्यावर नेमकी ती घसरली व हे चारही जण नाल्यात पडले आणि प्रवाहात सापडले. जगदीश चौरे व त्यांचे वडील कसेबसे काठावर आले; मात्र अंधारात दोन्ही मुले वाहत गेली. ही वार्ता जवळपासच्या गावात पोहोचताच रात्रीपासूनच गावकºयांनी शोधमोहीम राबविली. तब्बल दहा तासानंतर धनश्रीचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर पाण्यात आढळला. मात्र, नैतिकचा मृतदेह अद्याप सापडला नाही. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.परिसरातील काटआमला, बहाद्दरपूर, उत्तमसरा, परलाम, गणोरी येथील लोकांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. गुरूवारी सकाळी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शोकमग्न कुटुंबाची भेट घेतली.शोध व बचाव पथक बेपत्ताजिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक या घटनेच्या ठिकाणी पोहोचले नव्हते. बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी, आसोरे व कर्मचारी, तलाठी एस.एस. गिल, महापालिका अग्निशमन दलाचे चार कर्मचारी व जवळपासच्या चार ते पाच गावांतील लोक रात्री ८ पासून दुसऱ्या दिवशी शोध घेत होते. या बाबीची दखल शोध व बचाव पथकाला घ्यावीशी वाटली नाही. याचा संताप गावकऱ्यांमध्ये होता.इसमाने चौघांना वाचविण्यासाठी घेतली उडीज्यावेळी हे चौघेही नाल्यात पडले, त्यावेळी काही लोक वाहत्या पाण्यामुळे थांबले होते. चौघे नाल्यात पडल्याचे पाहून बहाद्दरपूरचे पुरुषोत्तम सुभेदार यांनी नाल्यात उडी घेतली व चौघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात मुलगा वाहत जात असताना पुरुषोत्तमच्या हाती त्याचे शर्ट लागले. यादरम्यान पुरुषोत्तमला पाण्यात वाहून आलेल्या एका झुडुपाचा मार डोक्याला बसला. यामुळे नैतिक हातातून निसटला आणि पुढे वाहत गेला.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यू