लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चोरट्यांनी एकाच दिवशी दोन दुकाने आणि दोन घरे फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. याशिवाय दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरटे बेफाम झाले आहेत. त्यांच्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दररोज निदर्शनास येणाऱ्या या घटनांवरून दिसून येत आहे.पोलीस सूत्रांनुसार, साईनगरातील कक्कड लेआऊट येथे राहणारे विनोद गुलाबराव सवई (५२) हे बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर निशाणा साधला. दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी व लाकडी आरमारीचे कुलूप तोडून त्यातील १२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह पर्समधील नगदी पाच हजार असा एकूण एकूण ५० हजार ६०० रूपयांचा ऐवज लंपास केला. यासंदर्भाची माहिती सवई यांना शेजाऱ्यांनी दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता, त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त झालेले दिसले. त्यांनी थेट राजापेठ ठाण्यात धाव घेवून तक्रार नोंदविली. चोरट्यांनी सवई यांच्या घरी हात साफ केल्यानंतर बाजूलाच राहणारे विकास विक्रम पोहते (६५) व आशा मणिलाल जेठवा (५५) यांच्या घराचाही कुलूपकोंडा तोडला. परंतु, ते घरी असल्याने चोरट्यांच्या हातात काहीही लागले नाही. राजापेठचे ठाणेदार किशोर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता नरवाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घरफोडीची दुसरी घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुंडलिकबाबा नगर येथे १३ नोव्हेंबरच्या रात्री उघड झाली. अक्षय अरुण इंगोले (२७) हे कार्यालयीन कामानिमित्त अकोला येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांना घराचा कुलूपकोंडा तुटलेला आढळला. चोरट्यांनी आलमारीतील ३४ हजार रोख व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ५० हजारांचा ऐवज लंपास केला. त्यांनी गाडगेनगर पोलिसांत धाव घेतली. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दोन दुकाने फोडली, दोन घरांवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST
पोलीस सूत्रांनुसार, साईनगरातील कक्कड लेआऊट येथे राहणारे विनोद गुलाबराव सवई (५२) हे बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर निशाणा साधला. दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी व लाकडी आरमारीचे कुलूप तोडून त्यातील १२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह पर्समधील नगदी पाच हजार असा एकूण एकूण ५० हजार ६०० रूपयांचा ऐवज लंपास केला.
दोन दुकाने फोडली, दोन घरांवर निशाणा
ठळक मुद्देपावणेतीन लाखांचा ऐवज लंपास : दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला; अमरावती शहरात चोरटे बेफाम