शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत आढळलेल्या दोन रोहिंग्यांची हैद्राबादला रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:43 IST

ब्रम्हदेशातील यादवीमुळे तेथून पलायन करून भारतात आश्रय घेणारे रोहिंग्या समुदायातील दोन तरुण चार दिवसांपूर्वी अमरावतीत आढळून आले.

 अमरावती - ब्रम्हदेशातील यादवीमुळे तेथून पलायन करून भारतात आश्रय घेणारे रोहिंग्या समुदायातील दोन तरुण चार दिवसांपूर्वी अमरावतीत आढळून आले. त्यांना दहशतवाद विरोधी कक्षाच्या पोलिसांनी पकडून हैद्राबाद येथील शरणार्थी शिबिरात परत पाठविले. हे रोहिंगे वर्गणी गोळा करण्याच्या उद्देशाने चपराशीपु-याजवळील एका धार्मीक स्थळी आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.       चपराशीपु-यातील धार्मीक स्थळाजवळ फिरताना आढळून आलेल्या या रोहिंग्यांची एटीसीच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली आणि त्यांच्याजवळील दस्तावेजांची तपासणी केली. त्यानंतर दोन पोलिसांसोबत दोन्ही रोेहिंग्यांना हैद्राबाद येथे पोहोचविण्यात आले. या अनुषंगाने एटीसी अधिका-यांकडे माहिती मागितली असता, त्यांनी दोघांचेही नावे देण्यास असमर्थता दर्शविली. 

सनातन संस्थेशी जुळलेल्यांवर पाळत मुंबईच्या एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथून सनातन संस्थेच्या एका पदाधिका-याच्या घरातून गावठी बॉम्ब व साहित्य जप्त केले. घातपात घडविण्याचा मोठा कट उघड झाल्यामुळे राज्यभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. अमरावतीमध्येही सनातन संस्थेशी जुळलेल्यांची चौकशी एटीसीने सुरू केल्याची विश्वसनीय माहिती हाती लागली आहे. सोबत हॉटेल, धार्मिक स्थळे याशिवाय संशयित प्रत्येक बारीकसारीक बाबींची तपासणी एटीसीने सुरु केली. 

रोहिंगे शरणार्थी वर्गणी गोळा करण्यासाठी अमरावतीत आले होते. चौकशी व दस्तावेज तपासून त्यांना हैद्राबादला रवाना केले आहे. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याAmravatiअमरावतीnewsबातम्या