शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

संजय वानखडेंच्या आत्महत्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:36 PM

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी वर्धा शाखा व्यवस्थापक व एका खातेदाराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देएकास अटक, मॅनेजर पसार : डॉ. पंजाबराव देशमुख बँक घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी वर्धा शाखा व्यवस्थापक व एका खातेदाराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला. कैलास काकडे (रा. वर्धा) याला पोलिसांनी अटक केली असून, बँक व्यवस्थापक अशोक झाडे पसार झाला आहे.समर्थ कॉलनीतील रहिवासी संजय वानखडे यांनी त्यांचे नातेवाईक दिलीप ठाकरे यांच्या घरात महिन्याभरापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्युपूर्वी ुलिहिलेल्या चिठ्ठीत वर्धा शाखेत झालेल्या घोळाचा उल्लेख केला होता. वर्धा शाखा व्यवस्थापक व खातेदारांनी संगनमताने बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याने बँकेचे नुकसान झाले. संचालक मंडळाच्या बदनामी होईल, या विचारातून संजय वानखडे मानसिक तणावाखाली आले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. वानखडे यांनी मृत्युपूर्वी त्यांचे बंधू प्रदीप ऊर्फ श्रीकांत वानखडे यांच्या नावे चिठ्ठी लिहून बँकेतील या सर्व घोळाबद्दलची माहिती नमूद केली होती.वर्धा शाखेचे व्यवस्थापक अशोक झाडे आणि कैलास काकडे नामक खातेदार यांनी बँकेतील व्यवहारात केलेल्या घोळामुळेच संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप प्रदीप वानखडे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत केला. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी अशोक झाडे व कैलास काकडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.पोलिसांनी कैलास काकडेला बुधवारी अटक केली असून, अशोक झाडे पसार झाला आहे. या कारवाईमुळे बँक अधिकारी व कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.२९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीपोलिसांनी अटक केलेला आरोपी कैलास काकडे याला गुरुवारी न्यायालयात हजर करून चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयात आरोपीचे वकील प्रशांत डबरासे यांनी युक्तिवाद केला. त्यामध्ये पीसीआरची आवश्यकता नाही, आरोपी खातेदाराचा या घटनेशी संबध नाही, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कोणातेही मुद्दे नाहीत, असा युक्तिवाद डबरासे यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.