शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी आणखी दोघांना एनआयएकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 11:07 IST

चंदा गोळा करणाऱ्याचा समावेश, दुसऱ्याने केली पळण्यास मदत

अमरावती : नुपूर शर्मा यांच्या समर्थनातील पोस्ट फॉरवर्ड करणारे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने बुधवारी सकाळी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. यातील एकावर कोल्हे यांची हत्या घडवून आणण्यासाठी रक्कम वा वर्गणी गोळा करण्याचा, तर दुसऱ्यावर याआधी अटक सात आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. एनआयएच्या पथकाने बुधवारी सकाळी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणले.

सूत्रानुसार, मुसीफ अहमद अ. रशीद (४१, रा. ट्रान्सपोर्टनगर, अमरावती) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (२३, रा. लालखडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एनआयएचे पथक दोन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहे. २१ जून रोजी रात्री १०.३०च्या सुमारास प्रभात चौकाकडून श्याम चौकाकडे जाणाऱ्या नूतन कन्याशाळेजवळ मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी आधी चाकूने हत्या करणाऱ्यांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर पशुचिकित्सक युसूफ खान व मास्टरमाईंड इरफान खान याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा करण्यात आला. २ जुलै रोजी पत्रपरिषद घेत पोलिसांनी उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे एनआयएकडे गेला. शहर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या सातही आरोपींचा ताबा एनआयएने घेतला. त्यांना एनआयएच्या मुंबईस्थित न्यायालयात हजर करून त्यांची एनआयए कोठडी मागण्यात आली होती.

...असा आहे आरोप

उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर व पूर्वीदेखील मुसीफने काही रक्कम गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, तर अ. अरबाज हा प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान याचा निकटवर्तीय असून, त्याचा वाहनचालक आहे. तो अनेकदा इरफानसोबत राहत असल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पूर्वी अटक केलेल्या सात आरोपींच्या तपासातून या दोघांचा सहभाग समोर आला. त्याआधारे ‘एनआयए’च्या पथकाने त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले, तर त्यांची सखोल विचारपूस करून बुधवारी सकाळी अटक केली.

ट्रान्झिट रिमांड मिळाला

अटक आरोपींना अटकेनंतर २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘एनआयए’च्या पथकाने त्या दोघांनाही बुधवारी दुपारी स्थानिक प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी स्थानिक न्यायालयाने ही विनंती मान्य करुन ७ ऑगस्टपूर्वी दोघांनाही मुंबईच्या ‘एनआयए’ न्यायालयात हजर करण्याबाबत परवानगी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा