वरूड तालुक्यात ३८१ घरांची पडझड : महसूल विभागाने केला पंचनामाराजूराबाजार : वरुड तालुक्यात चार दिवसांपासून संततधार पावसाने सुरुवात केल्याने तालुक्यात ३८१ घरांची अंशत: पडझड झाली यामध्य राजूराबाजार येथील दोन घरांची पूर्णत: पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे पूर्णत: पडलेल्या दोन घरातील कुटुंबांना ९ हजार ३०० रुपये सानुग्रह मदतीचे वाटप करण्यात आले. महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाने अंशत: पडलेल्या घरांचे पंचनामे करणे सुरु केले आहे.चार दिवसांपासून तालुक्यात संततधार पावसामुळे झडीचे वातावरण होते. यामध्ये कच्च्या घरांच्या भिंतीना पाझर फुटले होते. राजुराबाजारमध्ये रामभाऊ वाघ आणि लक्ष्मीबाई नारिंगे यांचे घरे जमीनदोस्त झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी नागरिकांच्या समयसुचकतेमुळे घरात असलेला ७६ वर्षीय रामभाऊ वाघ या म्हाताऱ्याला वाचविण्यात यश आल्याने प्राणहानी झाली नाही. तालूुक्यात सततच्या पावसाने ेजनज्ीावन विस्कळीत झाले होते. ेअनेक शेतात पाणी साचले होते. गावामध्येसुध्दा अनेक घरांच्या भिंती पडल्या. यामध्ये एकूण ३८१ घरांची पडछड झाली. यामध्ये राजुरराबाजारच्या दोन घरांचे पूर्णत:र् नुकसान झाले. तालुक्यातील सात महसूली मंडळामध्ये वरुडमध्ये २२ , वाठोडा येथे ३९, पुसला येथे २६, शेंदूरजनाघाट येथे ७८, राजुराबाजार २७, लोणी ८२, बेनोडा ९७ अशंत: घरांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने सांगितले. संततधार पावसामुळे अनेक घरांची कवेलू पाझरायला लागली होती तर स्लॅबसुध्दा थबकू लागली होती. राजुराबाजारच्या पूर्णत: कोसळलेल्या दोन घरांतील वाघ आणि नारींगे कुटुंबाची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था सांस्कृतिक भवनामध्ये ेकरण्यात आली असून तातडीची ९ हजार ३०० रुपयांची सानुग्रह मदत महसूल विभागाने केली आहे. पंचायत समिती आणि महसूल प्रशानाने संयुक्त पंचनामे करण्याकरिता पत्र पाठविले असून पंचनामे सुरु आहे. सततच्या पावसाने शेतातसुध्दा पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. (वार्ताहर)
अतिपावसामुळे राजुराबाजार येथील दोन घरे जमीनदोस्त
By admin | Updated: August 8, 2015 00:21 IST