शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

उपोषणकर्त्यांपैकी दोघांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 01:45 IST

चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर अन्यायग्रस्त माजी सैनिक व शेतमजुरांनी उपोषण थाटले आहे.

ठळक मुद्देमाजी सैनिक : भूमिहीन शेतमजुरांच्या उपोषणाचा सहावा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर अन्यायग्रस्त माजी सैनिक व शेतमजुरांनी उपोषण थाटले आहे. एकूण दहा उपोषणकर्त्यांपैकी माजी सैनिकाची पत्नी नंदा झोड आणि भूमिहीन शेजमजूर अनिल बोदुले यांची मंगळवारी प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.अन्यायग्रस्त उपोषणकर्त्यांमध्ये माजी सैनिक नारायण थोरात, अविनाश सिरसाट, बेबी जायले, संगीता सपकाळ, नंदा झोड, अनिल बोदुले, देविदास बोदुले, रामदास बोदुले, दिवाकर बोदुले आदींचा समावेश आहे. माजी सैनिक व भूमिहीन लाभार्थ्याना ताबा देण्यात यावा असे मुख्य सचिवांचे परिपत्रक असूृनही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. जमिनीचा ताबा मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.रवी राणा, बबलू देशमुख, राजेंद्र गवर्ईंची भेटजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ डिसेंबरपासून चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतमजूर अशा दहा जणांनी न्याय्य हक्कांसाठी उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, कमलताई गवई आदींनी भेटी दिल्या.

टॅग्स :Strikeसंप