शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
2
कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार
3
PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'
4
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला, दोन दिवसांपूर्वी उसळला होता हिंसाचार 
5
"मला मूल नको होतं, पण...", प्रेग्नंन्सीनंतर अदिती सारंगधरला आलं होतं डिप्रेशन; म्हणाली- "नवऱ्याबरोबर भांडण व्हायचं..."
6
भारताच्या विजयाची शक्यता होती केवळ ८%; रोहितने खेळला 'डाव' अन् पाकिस्तानची 'दांडी गुल'
7
समोसा, पिझ्झा, बर्गर खाल्लं तरी वजन वाढणार नाही; फक्त करा 'हे' काम, रिसर्चमध्ये खुलासा
8
दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम
9
पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'
10
एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास
11
"महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी"; विजय वडेट्टीवारांचा दावा
12
Electric वाहनांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २०% चं अपर सर्किट
13
राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा
14
सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा
15
37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरातच आढळला मृतदेह; काजोलसोबत केलंय काम
16
Chirag Paswan Net Worth: २ कोटींची संपत्ती, शून्य कर्ज; पाहा Modi 3.0 मध्ये मंत्री बनलेल्या चिराग पासवानांकडे काय काय आहे?
17
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...
18
IND vs PAK मॅच बघायला लेकीसह न्यूयॉर्कला गेल्या अमृता फडणवीस, नेटकरी म्हणाले- "शपथविधी सोडून..."
19
दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!
20
Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:09 AM

फोटो ०३एएमपीएच०१ लोकमत न्यूज नेटवर्क शिरखेड/तिवसा (अमरावती) : जिल्ह्यात दोन दिवसांत दोन युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विचोरी व वाठोडा ...

फोटो ०३एएमपीएच०१

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरखेड/तिवसा (अमरावती) : जिल्ह्यात दोन दिवसांत दोन युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विचोरी व वाठोडा खुर्द येथे या घटना घडल्या.

शिरखेड लगतच्या विचोरी येथे एका ३० वर्षीय शेतकरी युवकाने विष घेऊन आत्महत्या केली. मनोज रामचंद्र मुळे असे मृताचे नाव आहे. १ जुलै रोजी कृषिदिनी ही घटना घडली.

मनोज मुळे यांनी वडिलोपार्जित दोन एकर शेतीत सोयाबीनची पेरणी केली होती. दहा एकर शेत लागवडीसाठी घेऊन त्यातसुद्धा पेरणी केली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पाऊस हुलकवणी देत असल्याने पेरलेल्या पिकाला मोड आली होती. पुढील पेरणी कशी करावी, या विवंचनेत मनोज मुळे यांनी राहत्या घरात विष प्राशन केले. याबाबतची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शुक्रवारी दुपारी मनोजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व वडील असा परिवार आहे.

तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील एका विवाहित अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली. गजानन वसंत कुबडे (३२, रा. वाठोडा) असे मृताचे आहे. २ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास घरी कुणीच नसताना विषारी औषध प्राशन केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कर्जापायी आत्महत्या केली असल्याचा सूर परिसरात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिमुकले मुले, आई-वडील आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.