शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांचे नवजात ठरले पाऊसबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

दुपारी १२ पासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप कायम ठेवले असतानाच घरामागील बाजूने दमयंती नदीच्या पुराचा लोंढा एकाएकी परिसरात घुसला. अनेक घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले. सुमनचा पती यावेळी मजुरीसाठी बाहेर गेला होता. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच महिलेला शिडी लावून एका घरातून दुसऱ्या घरात असे करीत सुरक्षित स्थळी हलविले.

नरेंद्र निकम ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरात ४ सप्टेंबरला आलेला महापूर जसे अनेक नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करून गेला तसेच त्याने एका मातेच्या काळजाचा तुकडा हिरावून नेला. महापुरात अडकलेले दोन दिवसाचे नवजात धो-धो बरसलेल्या पावसाचे बळी ठरले. गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर या घटनेने आभाळच कोसळले.शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या दमयंती नदीच्या काठावरील गधेघाटपुरा येथील सुमन नानू सूर्यवंशी या २८ वर्षीय महिलेने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. सात वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या मातेला पाच वर्षांची सोनाली ही मुलगी आहे. नैसर्गिक प्रसूतीनंतर ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या नवजाताला ती आनंदाने न्हाऊ घालणार, अंगाखांद्यावर खेळविणार होती. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दुपारी १२ पासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप कायम ठेवले असतानाच घरामागील बाजूने दमयंती नदीच्या पुराचा लोंढा एकाएकी परिसरात घुसला. अनेक घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले. सुमनचा पती यावेळी मजुरीसाठी बाहेर गेला होता. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच महिलेला शिडी लावून एका घरातून दुसऱ्या घरात असे करीत सुरक्षित स्थळी हलविले. पुराच्या लोंढ्याने घरातील सर्व सामान वाहून नेल्याने नवजात बालकावर धरायला ना कुठली टोपली, ना वरून छत. पुराच्या पाण्यातून डोक्यावर दोन हातांवर घेऊन त्याला आईजवळ नेण्यात आले. ते पावसाचा मार सहन न करू शकल्याने लगेच आजारी पडले. मोर्शीत प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. पाच तासांत पुराचे पाणी ओसरले; मात्र मातेच्या आसवांचा बांध फुटला.एक दिवस उशिरा सुटी झाली असती तर....नैसर्गिक प्रसूतीमुळे सुमन व नवजात बालकाला दवाखान्यातून दोन दिवसांत सुटी देण्यात आली. त्यानंतर दोन तासांत महापूर आला. एक दिवस उशिरा सुटी झाली असती, तर बाळ वाचले असते, अशी खंत सुमनचे वडील बाबूलाल सेमलकर यांना आहे. आठ दिवसांची प्रसूत माता पुराच्या पाण्याने आजारी पडल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.सासऱ्यांच्या आश्रयाने उदरनिर्वाहनानू सूर्यवंशी (रा. इटावा माजरी, जि. बैतुल, मध्यप्रदेश) हा सासू-सासऱ्यांच्या आश्रयाने तीन वर्षांपासून मोर्शी येथे राहतो. त्यांच्याकडे बँकेचे पासबूक नाही. त्यामुळे तात्काळ मदत कशी मिळणार, ही विवंचना आहे. नानूच्या घरातील सिलिंडरसह धान्य व सर्व साहित्य वाहून गेले.चार महिन्यांचे बाळ सुरक्षितपरिसरातील सुनीता विशाल पिंपळकर या महिलेच्या चार महिन्यांच्या बाळाला कुटुंबीयांनी वेळीच सुरक्षित स्थळी हलविले. शहरात दिवसा पूर आल्याने जीवितहानी झाली नसली तरी नवजात दगावले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर