शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

अमरावतीत भूगर्भशास्त्र विभागाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद, १९ व २० डिसेंबर रोजी आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:27 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या वतीने बेसिन डायनॅमिक्स, फेसिस आर्किटेक्चर अँड पॅलिओक्लायमेट आणि ३४ वी इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्स या विषयावर १९ व २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या वतीने बेसिन डायनॅमिक्स, फेसिस आर्किटेक्चर अँड पॅलिओक्लायमेट आणि ३४ वी इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्स या विषयावर १९ व २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून लखनौ येथील नॉर्थ रिजन जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे माजी महासंचालक डी.एम. मोहाबे उपस्थित राहतील. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लेबॉरटरी ए. के. सिंघवी बीजभाषण करतील. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्सचे सचिव एम. रझा, कुलसचिव अजय देशमुख, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख एस. एफ. आर. खाद्री यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.परिषदेचा समारोप २० डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर व इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्सचे अध्यक्ष जी. एन. नायक भूषवतील. कार्यक्रमाला वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागातील बी.पी. सिंह, चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागातील आर. नागेंद्र व आयआयटी पवईचे एस. बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला भूगर्भशास्त्र विभागाचे संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्सचे संयोजक अशोक श्रीवास्तव व अध्यक्ष जी. एन. नायक यांनी केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती