शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 22:08 IST

सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.

 धामणगाव रेल्वे (अमरावती)  - सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित करणाºया धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या बोरगाव धांदे परिसरात रेतीघाट क्रमांक २६९ येथून अवैध रेती उत्खनन व साठवणूक केलेली रेती मध्यरात्री तसेच पहाटे नेली जात असल्याची माहिती अमरावती जिल्हा विशेष शाखेचे परीविक्षाधीन अधिकारी समीर शेख यांनी मिळाली. दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांनी आपल्या विशेष पथकासह या रेती उत्खननावर कारवाई केली़ अमरावती, कारंजा व अकोला जिल्ह्यात जाणारे ९२ ट्रक त्यांनी पकडले़ ताब्यात घेतलेल्या ट्रकची तब्बल पुलगाव ते देवगाव रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत रांग होती.  विशेषत: तीन पोकलॅन, दोन डोंगीही जप्त केल्या. सदर कारवाईनंतर तब्बल ९२ ट्रक तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ या कारवाईत जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी सदानंद मानकर, वासुदेव नागवरकर, सुनील मलातपुरे, बाबा ठाकरे, अतुल गवळी, अश्विनी यादव, अरविंद लोहकरे, तळेगाव दशासरचे ठाणेदार, गोपाल उपाध्याय, मंगरूळचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ वृत्त लिहिपर्यंत संबंधित ट्रकवर कारवाई व्हायची होती़ पोलीस प्रशासनाची सर्वांत मोठी रेती तस्करीविरुद्ध केलेली ही पहिली कारवाई आहे़

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र