शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांना लागणार दोन कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:00 IST

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील.

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. अमरावती विभागाशी संलग्न सात प्रकल्प कार्यालय स्तरावर दोन कोटी रुपयांतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचा प्रस्ताव असून, त्याकरिता लवकरच ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये आरोग्य सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे मृत्यू , विद्यार्थिनींचे लैंगिक शौषण, साप चावल्याने मृत्यू, निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छ पाणीपुरवठा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची गैरहजेरी अशा एक ना अनेक समस्या, प्रश्नांचा सामना आदिवासी विद्यार्थ्यांना करावा लागतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात अमरावती अपर आयुक्त कार्यालयाला धारणी, अकोला, पुसद, नांदेड, औरंगाबाद, कळमनुरी आणि पांढरकवडा सात प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमे-यांचा मागणी प्रस्ताव आला आहे. 

अशी होईल खरेदीई-निविदा प्रक्रियेतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य साहित्य हे ब्रॅण्डेड कंपनीचे असावे, अशी अट आहे. यात आऊटडोअर सीसीटीव्ही कॅमेरे ६४५, इनडोअर कॅमेरे २८२, मेमोरी स्टोअर (एनईआर) ९१, मॉनिटर १२७, हार्डडिस्क १२७, केबल ६३७०० मीटर, पीओ स्विच १२७, ब्राऊन ट्रॅक २१३ आणि जीआय केबल २६३५२ मीटर यांचा समावेश राहणार आहे. अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात संस्थाचालकांना पत्राद्वारे कळविले आहे, तर शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमे-यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाईल.- गिरीश सरोदे,अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :cctvसीसीटीव्हीAmravatiअमरावती